Sanjay Raut | “‘त्या’ दोन विचारांची युती हे बाळासाहेब ठाकरे यांचं जूनं स्वप्न”; युतीबाबत संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

Sanjay Raut | मुंबई : उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची आज युती होत आहे. आज दुपारी या युतीची अधिकृतपणे घोषणा केली जाणार आहे. उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची दुपारी संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. त्यामुळे या युतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. या युतीवर ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाष्य केलं आहे.

ते म्हणाले, “आज महाराष्ट्रात खूप मोठी क्रांतिकारक घोषणा होईल, लोक त्याला राजकारण म्हणू शकतात. राजकारण आहे तर राजकारण आहे. बाबासाहेबांचे नातू आणि प्रबोधनकार ठाकरेंचे नातू एकत्र येणार आहेत. ही तर सुरुवात आहे. आता महाराष्ट्रात अजून बरंच काही घडणार आहे.”

“ही दोन पक्षाची युती नाही. तर शिवशक्ती-भीमशक्तीची युती आहे. ही विचारांची युती आहे. दोघांची ताकद महाराष्ट्राबाहेरही आहे. बाळासाहेब ठाकरे यांचं हे स्वप्न होतं. दोन्ही विचारधारा एकत्र याव्यात. दोन शक्ती एकत्र याव्यात. कुणाला वाटत असेल आमच्यामागे महाशक्ती आहे, आम्हाला महाशक्तीचा पाठिंबा आहे, पण त्यात तथ्य नाही, असं म्हणत त्यांनी शिंदे गट आणि भाजपाला टोला लगावला.

“ठाकरे-आंबेडकर एकत्र येईल ती खरी महाशक्ती असेल. त्या महाशक्तीसमोर कुणाचा टिकाव लागणार नाही. या महाशक्तीमुळे आघाडी अधिकच मजबूत होईल”, असंही संजय राऊत (Sanjay Raut) यावेळी बोलताना म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :