Monsoon Update | शेतकऱ्यांसाठी आनदांची बातमी, पावसाचा अचूक अंदाज येणार हाती; जाणुन घ्या पूर्ण माहिती

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Monsoon Update | यावर्षी पावसाने उन्हाळ्यात देखील हजेरी लावली. तर काही भागात अवकाळी पावसाचा (Unseasonal rain) शेतकऱ्यांच्या पिकांना चांगलाच फटका बसला आहे. दररोज हवामान विभागाने याबाबत माहिती देऊन देखील अवकाळीचा फटका बसलेला पाहायला मिळाला. अनेक वेळा निसर्गाच्या बदलत्या चक्रामुळे शेतकरी हतबल होत आहे. याच पार्श्वभूमीवर आता शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून त्याची घोषणा केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्री किरेन रिजीजू (Kiren Rijiju) यांनी केली आहे.

सुपर कॉम्प्युटरमुळे येणार हवामानाचा अचूक अंदाज-

नुकतीच नोएडा येथील नॅशनल सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर फोरकास्टिंग (NCMRWF) या संस्थेला किरेन रिजीजू (Kiren Rijiju) यांनी भेट दिली. त्या ठिकाणी सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला त्यानंतर किरेन रिजीजू (Kiren Rijiju) घोषणा केली. त्यांनी म्हटल आहे की, 2023 च्या अखेर पर्यंत भारत एक नवा सुपर कॉम्प्युटर ( Super Computer) कार्यरत करणार आहे. ज्यामुळे आपल्याला अचूक आणि झटपट हवामानाचा अंदाज ( weather forecasting) घेणं शक्य होणार आहे. यामुळे जर हवामानाचा अचूक अंदाज लागला तर याचा फायदा देखील शेतकऱ्यांना होणार आहे.

new supercomputer for weather forecasting

दरम्यान, या सुपर सुपर कॉम्प्युटरद्वारे ( Super Computer) बर्फवृष्टी, चक्रीवादळ, वादळ, पाऊस अशा सर्व नैसर्गिक आपत्तींचा अंदाज सात दिवस अगोदर घेता येणार असून सुपर कॉम्प्युटरमध्ये, सामान्य कॉम्प्युटरपेक्षा जास्त उच्च पातळीची गणना केली जाऊ शकते असं देखील सांगण्यात येत आहे. तसचं हवामान अंदाज (weather forecasting), हवामान संशोधन, तेल आणि नैसर्गिक वायूचा शोध, एअरक्राफ्ट आणि स्पेसक्राफ्टसाठी एरोडायनॅमिक्स निश्चित करणे स्फोट आणि अण्वस्त्रांचे संचलन यासारखी कार्ये देखील या सुपर कॉम्प्युटरद्वारे येऊ शकतात. अशी माहिती देण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या-