Devendra Fadnavis | बहिष्कार म्हणजे लोकशाही नाकारणं; संजय राऊतांच्या टीकेला फडणवीसांचं प्रत्युत्तर

Devendra Fadnavis | मुंबई: 28 मे रोजी नवीन संसद भवनाचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. या संसद भवनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते केले जाणार आहे. राष्ट्रपतींना या कार्यक्रमाचे निमंत्रण नसल्याची माहिती मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहे. नवीन संसद भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमास आम्ही बहिष्कार टाकत आहोत, असं वक्तव्य संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं होतं.

Devendra Fadnavis’s response to Sanjay Raut’s criticism

संजय राऊत यांच्या वक्तव्याला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, “बहिष्कार टाकणं म्हणजे लोकशाही नाकारणं आहे. इंदिरा गांधी यांनी संसदेच्या एनेक्स बिल्डिंगचं उद्घाटन केलं होतं. तेव्हा त्यांनी हा मुद्दा का उचलून नाही धरला?”

पुढे बोलताना ते (Devendra Fadnavis) म्हणाले, “विरोधकांना देशाशी काही घेणं-देणं नाही. त्याचबरोबर त्यांना देशाच्या संविधानाबद्दल देखील काही घेणं-देणं नाही. त्यांना फक्त खुर्ची आणि सत्ता हवी आहे. त्यासाठी ते असे दावे करत असतात.”

संजय राऊत काय म्हणाले? (What did Sanjay Raut say?)

संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “देशाची अर्थव्यवस्था कमकुवत असताना सेंट्रल व्हिस्टा का उभारलं आहे? आपली जुनी संसद आणखी शंभर वर्ष टिकेल इतकी बळकट आहे. तरीही नवीन संसद उभारली गेली. 28 मे रोजी नवीन संसद भवनाचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमास काँग्रेससह आमचा बहिष्कार आहे.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.