HSC Result | 12 वी निकालामध्ये मुली अव्वल स्थानी! ‘या’ विभागाचा लागला सर्वाधिक निकाल

HSC Result | टीम महाराष्ट्र देशा: राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या 12 वी परीक्षेचा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला आहे. शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात बारावीचा निकाल 91.25 टक्के लागला आहे. तर यावर्षीही या निकालामध्ये मुलींनी बाजी मारली आहे. मुलांच्या तुलनेमध्ये मुलींचा निकाल 4.59 टक्क्यांनी अधिक लागला आहे.

‘This’ section got the highest HSC Result

यावर्षी राज्याचा बारावीचा निकाल (HSC Result) 91.25 टक्के लागलेला असून बारा लाखांहून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. यामध्ये कोकण विभागाचा सर्वाधिक तर मुंबईचा निकाल सर्वात कमी लागला आहे. कोकण विभागाचा निकाल 96.01% आहे. तर मुंबईचा निकाल 88.14 टक्के लागला आहे.

Follow these steps to see the HSC results

  • विद्यार्थ्यांना सर्वप्रथम या http://mahresult.nic.in अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.
  • त्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांचा सीट नंबर आणि जन्मतारीख प्रविष्ट करावी लागेल.
  • सीट नंबर आणि जन्मतारीख टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा निकाल दिसेल.
  • त्यानंतर तुम्ही निकालाची प्रिंट आऊट काढू शकतात.

विद्यार्थी महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन निकाल (HSC Result) बघू शकतात. तर निकाल लागल्यानंतर काही दिवसात विद्यार्थ्यांना त्यांचे ओरिजनल मार्कशीट त्यांच्या कॉलेजमध्ये मिळतील.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.