HSC Result | टीम महाराष्ट्र देशा: राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या 12 वी च्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. दुपारी आज (25 मे) 2 वाजता हा निकाल जाहीर करण्यात आला आहे. शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात बारावीचा निकाल 91.25 टक्के लागला आहे. तर यावर्षीही या निकालामध्ये मुलींनी बाजी मारली आहे. मुलांच्या तुलनेमध्ये मुलींचा निकाल 4.59 टक्क्यांनी अधिक लागला आहे.
Want to photocopy or recheck HSC Result paper?
12 वी मध्ये (HSC Result) काही विद्यार्थी नापास झाले. तर, काही विद्यार्थी कमी गुण मिळाल्यामुळे नाराज झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची नाराजी दूर करण्यासाठी बोर्डाकडून पेपर गुणपडताळणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. गुणपडताळणी करण्यासाठी विद्यार्थी खालील पद्धत फॉलो करू शकतात.
- गुणपडताळणीसाठी विद्यार्थ्यांना http://verification.mh-hsc.ac.in या वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
- त्यानंतर विद्यार्थ्यांना डेबिट कार्ड, यूपीआय किंवा नेट बँकिंगद्वारे शुल्क भरावा लागेल.
- विद्यार्थ्यांना प्रति विषय 50 रुपये शुल्क भरावा लागणार आहे.
- विद्यार्थ्यांना गुणपडताळणीसाठी 5 जून पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.
त्याचबरोबर विद्यार्थ्यांना (HSC Result) उत्तर पत्रिकेची फोटोकॉपी ईमेल, वेबसाईटवरून किंवा रजिस्टर पोस्टाने पाठवली जाते. उत्तर पत्रिकेची फोटोकॉपी मिळवण्यासाठी विद्यार्थी 14 जूनपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. उत्तर पत्रिकेची फोटोकॉपी मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रति विषय 400 रुपये शुल्क भरावा लागणार आहे. फोटोकॉपीसाठी विद्यार्थ्यांना या http://verification.mh-hsc.ac.in वेबसाइटला जाऊन ऑनलाइन अर्ज करावा लागेल.
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis | सापनाथ आणि नागनाथ एकत्र आले तरी मोदींचा पराभव करू शकत नाही- देवेंद्र फडणवीस
- Devendra Fadnavis | बहिष्कार म्हणजे लोकशाही नाकारणं; संजय राऊतांच्या टीकेला फडणवीसांचं प्रत्युत्तर
- Tata Group | अभिमानस्पद! टाटाने मिळवले जगातील टॉप 20 कंपन्यांमध्ये स्थान
- COVID-19 | कोरोनापेक्षा भयंकर महामारी जगात येऊ शकते, जागतिक आरोग्य संघटनेचा (WHO) इशारा
- Shivsena | ठाकरे गटाचे खासदार लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार; शिंदे गटाचा दावा