Nana Patole | “मला शक्तीशाली समजल्याबद्दल…”; राऊतांच्या टीकेला नाना पटोलेंचं सडोतोड उत्तर

Nana Patole | मुंबई : काँग्रेसमधील अंर्तगत धूसपूसीनंतर महाविकास आघाडीतील इतर पक्षांनी आपली भूमिका मांडली आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीका केली होती. “नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नसता तर राज्यातील ठाकरे सरकार कोसळलं नसतं”, असे वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. संजय राऊत यांच्या या आरोपाचा नाना पटोले यांनी आता शब्दात समाचार घेतला असून शिवसेनेच्या नेतृत्वावरच बोट ठेवलं आहे.

“मला शक्तीशाली समजल्याबद्दल राऊतांचे आभार”

मला शक्तीशाली समजत असल्याबद्दल संजय राऊत यांचे आभार मानतो. मी राहिलो असतो तर खोक्याचं सरकार आलं नसतं. मी राहिलो असतो तर महाविकास आघाडीचं सरकार राहिलं असतं. अशा पद्धतीचं वक्तव्य करून ते माझ्या शक्तीचा परिचय करून देत आहे. त्यांनी माझ्या शक्तीचा देशाला परिचय करून दिला आहे, असा चिमटा नाना पटोले यांनी संजय राऊतांना काढला आहे.

“राऊतांचा पक्ष कमजोर?”

“संजय राऊतांचा पक्ष कमजोर होता का? त्या पक्षाचं नेतृत्व कमी पडत होतं का? असं संजय राऊत यांना म्हणायचं आहे का? हा प्रश्न निर्माण होतो”, असेही नाना पटोले म्हणाले आहेत. “त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी काय केलं ? हे सांगावं. राज्यात अनेक प्रश्न आहेत त्यात त्यांनी लक्ष घालावं ही माझी विनंती आहे. हायकमांडनं घेतलेल्या निर्णयावर बोलू नये आणि संजय राऊत यांनी वादावर पडदा पाडावा”, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

“मी फक्त राऊतांना सल्ला देऊ शकतो” (Nana Patole comment on Sanjay Raut)

मला संवैधानिक अधिकार होते. त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी काय केलं नाही केलं, त्यावर ते बोलत नाहीत. राऊत यांनी हे प्रश्न काढल्याने महागाई, बेरोजगारी आणि शेतीचे प्रश्न निकाली निघणार नाही. राऊतांनी या प्रश्नात लक्ष घालावं. भाजपने खोक्यानं सरकार पाडलं. आपण राज्यातील प्रश्नावर लक्ष दिल्यास भाजपला उत्तर देऊ शकतो. मी फक्त राऊतांना सल्ला देऊ शकतो. मी काही विद्वान नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

“माझ्या राजीनाम्याचा निर्णय हायकमांडचाच”

“मला अधिकार होते. त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी काय केलं ते त्यावर ते बोलत नाही. भाजपने सरकार पाडलं. आपण राज्यातील प्रश्नावर लक्ष द्यावं, मी फक्त राऊतांना सल्ला देऊ शकतो, मी काही विद्वान नाही. अध्यक्षपद देण्याचा निर्णय हा काँग्रेस हायकमांडचा होता. राजीनाम्याचा निर्णय सुद्धा त्यांनाच विचारून घेतला. पक्षाचा आदेश मी पाळला. पक्षाचा आदेश पाळणार मी कार्यकर्ता आहे, त्यावर आता कुणी बोलू नये”, असंही पटोले म्हणाले आहेत.

“काँग्रेसमध्ये वाद असल्याचं भाजपने उठवलेली वावडी”

“काँग्रेसमध्ये कोणतेच वाद नाही. ही भाजपनं उठवलेली वावडी आहे. पदवीधर निवडणुकीमध्ये विदर्भात झालेला पराभव भाजपला जिव्हारी लागला आहे म्हणून विषय डायव्हर्ट करण्यासाठी अश्या खोट्या बातम्या पेरतं आहे, भाजपात अंतर्गत खदखद आहे, आमच्यात नाही. पक्ष कार्यालय सगळ्यांसाठी, कोणताही नेता तिथे बैठक घेऊ शकतं. रायपूरला राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक आहे. यानंतर बरेच फेरबदल होतील”, असे नाना पटोले म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.