Sachin Ahir | राहुल कलाटेंच्या मनधरणीसाठी सचिन अहिरांनी घेतली भेट; कलाटे माघार घेणार का?

Sachin Ahir | पुणे : पुणे शहरातील चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर चिंचवड मतदारसंघासाठी पोटनिवडणूक होणार आहे. भाजपने ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी अनेक प्रयत्न केले आणि विरोधकांना आवाहनही केले मात्र महाविकास आघाडीने नाना काटे यांना उमेदवारी दिली आहे. ठाकरे गटाचे नेते राहुल कलाटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

राहुल कलाटे यांनी उमेदवारी मागे घ्यावी, यासाठी ठाकरे गटाकडून कलाटे यांची मनधरणी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते सचिन अहीर यांनी आज राहुल कलाटे यांची भेट घेतली आहे. त्यानंतर आता अचिन अहिर यांनी माध्यमांशी चर्चा केली आहे.

“कलाटे नक्कीच माघार घेतील” (Sachin Ahir meet Rahul kalate)

“पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा निरोप घेऊन मी राहुल कलाटे यांची भेट घेण्यासाठी आलो होतो. ‘राहुल कलाटे यांनी निवडणुकीत माघार घ्यावी, भविष्यात महाविकास आघाडीकडून त्यांना राजकीय मदत केली जाईल’, उद्धव ठाकरेंचा हा निरोप आम्ही त्यांना दिला. तसेच त्यांचं आज उद्धव ठाकरे यांच्याशी देखील बोलणं झालं आहे. उद्धव ठाकरे यांनी त्यांना माघार घेण्याची विनंती केली आहे. त्यामुळे आमचा सर्वांचा आग्रह ग्राह्य धरून त्यांनी या निवडणूक माघार घ्यावी, अशी विनंती आम्ही त्यांना केली आहे. याबाबत मी एकटा निर्णय घेऊ शकत नसून कार्यकत्यांशी चर्चा करून निर्णय जाहीर करू, असं कलाटे यांनी सांगितलं. राहुल कलाटे हे नक्कीच माघार घेतील आणि महाविकास आघाडीबरोबर राहतील”, अशी प्रतिक्रिया सचिन अहीर यांनी दिली आहे.

“मी निवडणूक लढण्यावर ठाम”- (Rahul Kalate)

“मी निवडणूक लढवण्यावर ठाम आहे. मी 2019 ला चिंचवड विधानसभा लढलेलो आहे. तेव्हा अपक्ष निवडणूक लढवण्याचा कोणी विचार केला नाही. दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या समोर मी लढलो. त्यावेळी नागरिकांनी भरभरून प्रेम दिलं आहे”, असे राहुल कलाटेंनी सांगितलं.

“राष्ट्रवादीने चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध दिल्यास मीही विचार करेल. काही दिवसांपूर्वी बिनविरोध पोटनिवडणूक होईल, असे वाटत होते. तेव्हा ‘मी वेट अँड वॉच’च्या भूमिकेत होतो. परंतु, निवडणूक लढवण्यास महाविकास आघाडी पुढे आल्यानंतर मी निवडणूक लढवण्याचे ठरवले”, असे राहुल कलाटे म्हणाले आहेत. आज उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस असून राहुल कलाटे माघार घेतात का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राहुल कलाटे यांची नाराजी”

“मला 100 टक्के विजयाची खात्री आहे. 2019लाही 1 लाख 12 हजार लोकांनी माझ्यावर प्रेम केलं आहे. आता त्यापेक्षाही जास्त प्रमाणात लोक माझ्यासोबत राहतील.माझी सुरुवातीपासून भूमिका अशी होती की महाविकास आघाडीत कुणालाही जागा गेली, तरी ही निवडणूक मी लढवेन. कारण मागील इतिहास पाहिला आणि या शहरात माझा गेल्या 5 वर्षांत झालेला जनसंपर्क, कोविड काळातील माझं काम पाहाता मला अपेक्षा होती की महाविकास आघाडीकडून माझ्या नावाचा नक्कीच विचार होईल”, असं म्हणत राहुल कलाटे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

Back to top button