PM Kisan Yojana | शेतकऱ्यांनो ही आहे शेवटची संधी! लवकरात लवकर बँक खाते आणि आधार कार्ड करून घ्या लिंक

PM Kisan Yojana | टीम कृषीनामा: लहान आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री निधी सन्मान योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेचे 12 हप्ते शेतकऱ्यांचा बँक खात्यावर पोहोचले आहे. शेतकरी गेल्या काही दिवसांपासून या योजनेतील 13 व्या हप्त्याची वाट बघत आहे. तेराव्या हप्त्यासाठी सरकारने कडक नियम जारी केले आहे. कारण या योजनेतील बारावा हप्ता मिळवण्यासाठी काही शेतकऱ्यांनी बघणावटी कागदपत्रांची मदत घेतली होती. त्यामुळे तेरावा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना जमिनीच्या कागदपत्रांची पडताळणी आणि ई-केवायसी त्याचबरोबर बँक खाते आधारशी लिंक करून घेणे अनिवार्य आहे. ही सर्व काम करण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांना 10 फेब्रुवारी पर्यंत वेळ दिली आहे. 10 फेब्रुवारीपर्यंत शेतकऱ्यांनी ही काम पूर्ण करून घ्यावी.

देशातील लाखो शेतकऱ्यांनी या योजनेतील बाराव्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी बनावटी कागदपत्रांची मदत घेतली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी तेरावा हप्ता जारी करण्यापूर्वी शेतकऱ्यांना आधार, बँक आणि जमिनीच्या पडताळणी करून घेणे अनिवार्य केले आहे. ही पडताळणीची काम पूर्ण न झाल्यामुळे तेरावा हप्ता जारी करण्यासाठी उशीर होत आहे. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर कागदपत्रांची पडताळणी करून घ्यावी, जेणेकरून योजनेतील रक्कम वेळेवर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल.

अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये पात्रता आणि नियमांच्या विरोधात जाऊन काही लोकांनी चुकीच्या पद्धतीने या योजनेतील बाराव्या हप्त्याची रक्कम मिळवली आहे. त्यामुळे या योजनेतील तेरावा हप्ता मिळवण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांसाठी काही कडक नियम योजले आहे. यामध्ये शेतकऱ्यांना जमिनीच्या कागदपत्रांची पडताळणी आणि ई-केवायसी करणे अनिवार्य आहे.

पीएम किसान योजना हेल्पलाइन नंबर (PM Kisan Yojana Helpline Number)

प्रधानमंत्री योजनेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही 155261 किंवा 1800-115526 या हेल्प नंबर क्रमांकावर कॉल करून करू शकतात. या क्रमांकावर कॉल करण्यासाठी शेतकऱ्यांकडून कोणत्याही प्रकारचा शुल्क आकारण्यात येत नाही. हा फोन कॉल शेतकऱ्यांसाठी पूर्णपणे टोल फ्री आहे.

महत्वाच्या बातम्या

Job Vacancies | नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू

Eye Care | डोळ्यांची काळजी घेण्यासाठी आहारात करा ‘या’ ज्यूसचा समावेश

Job Opportunity | राज्य शासनाच्या ‘या’ विभागात नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर

Weather Update | ‘या’ तारखेपासून राज्यातील थंडी गायब होणार, पाहा हवामान अंदाज

Diabetes | डायबिटीसच्या रुग्णांनी नाश्त्यात करावे ‘या’ पदार्थांचे सेवन, मिळतील अनोखे फायदे