MNS | “जर हिंमत असेल तर…”; आदित्य ठाकरेंना मनसे नेत्याचं ओपन चॅलेंज 

MNS | मुंबई : सहा महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेच्या ४० आमदारांसह बंड पुकारलं. शिंदे यांच्या गटाने भाजपसोबत युती करत राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन केलं. तेव्हापासूनच हे सरकार घटनाबाह्य असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून केला जातोय.

त्याचबरोबर ठाकरे गटाकडून राज्य सरकारवर वारंवार खोके सरकार अशी टीका केली जात आहे. यावर बोलताना मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना खुलं आव्हान दिलं आहे.

एकिकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांचं सरकार अवैध, घटनाबाह्य आहे, असे आरोप करायचे आणि दुसरीकडे सरकारच्या जाहिराती शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रातून छापून आणायच्या. ही दुटप्पी भूमिका असल्याचं म्हणत संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी ठाकरे गटाला सुनावलं आहे.

संदीप देशपांडे यांचं आदित्य ठाकरेंना आव्हान (Sandeep Deshpande Challenge to Aditya Thackeray)

“हिंमत असेल तर या सरकारच्या जाहिराती नाकारून दाखवा”, असं आव्हान त्यांनी आदित्य ठाकरे यांना दिलं आहे. सामना वृत्तपत्रातून एकनाथ शिंदे सरकारच्या जाहिराती प्रकाशित करण्यावरून मनसेनं आतापर्यंत अनेकदा आक्षेप घेतला आहे. एकीकडे म्हणताय हे सरकार घटनाबाह्य आहे. मग घटनाबाह्य सरकारच्या जाहिराती तुम्हाला सामनामध्ये कशा चालतात?, असा खोचक सवाल संदीप देशपांडे यांनी केलाय.

महत्वाच्या बातम्या :

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.