Share

Eknath Shinde | “तुला निवडून आणण्यासाठी तुझ्या बापाने…”; आदित्य ठाकरेंच्या चॅलेंजवरून शिंदे गटाच्या नेत्याचे गंभीर आरोप 

🕒 1 min read Eknath Shinde | मुंबई : युवासेनेचे प्रमुख आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना थेट आव्हान दिले आहे. ‘हिंमत असेल तर राजीनामा देऊन वरळीतून लढवून दाखवा. तुम्ही निवडून कसे येता हे पाहतो’, असे ओपन चॅलेंज आदित्य ठाकरे यांनी शिंदे यांना दिले आहे. यावर … Read more

Published On: 

🕒 1 min read

Eknath Shinde | मुंबई : युवासेनेचे प्रमुख आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना थेट आव्हान दिले आहे. ‘हिंमत असेल तर राजीनामा देऊन वरळीतून लढवून दाखवा. तुम्ही निवडून कसे येता हे पाहतो’, असे ओपन चॅलेंज आदित्य ठाकरे यांनी शिंदे यांना दिले आहे. यावर शिंदे गटाचे नेते  रामदास कदम (Ramdas kadam) यांनी आदित्य ठाकरे यांना चांगलंच सुनावलं आहे.

“आदित्य ठाकरे सध्या मुख्यमंत्र्यांना चॅलेंज देतोय. पण अरे तुला निवडून आणण्यासाठी तुझ्या बापाने उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेचे दोन आमदार दिले, माझीही विधान परिषद तुझ्या मतदार संघात दिली. तेव्हा तू निवडून आलायस. तू काय मुख्यमंत्र्यांना चॅलेंज देतो?”, असा सवाल करत त्यांनी आरोप केले आहेत. ते TV9 मराठी या वृत्तवाहिनीशी बोलत होते.

प्रसिद्धी मिळवण्यासाठी पोपटपंची आहे, असा टोला रामदास कदम यांनी आदित्य ठाकरेंना लगावला. दरम्यान,आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी १०० जागा निवडून आणणार असल्याचं म्हंटल होतं. यावर “शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीने युती केली आहे. मात्र वंचित महाविकास आघाडीत नाही. त्यामुळे २८८ पैकी शिवसेनेच्या वाट्याला समजा ९० जागा आल्या. तर शिवसेनेतल्या ९० पैकीच काही जागा वंचितला द्याव्या लागणार. त्यापैकी २० जागा जरी वंचितला द्यायच्या म्हटलं तर आदित्य ठाकरे १०० जागा कुठून आणणार? का वाढवून देणार का?” असा सवाल रामदास कदम यांनी केलाय.

Aditya Thackeray Challenge to Eknath Shinde 

“मी वरळीतून राजीनामा देतो. घटनाबाह्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा देऊन माझ्यासमोर वरळीतून उभे राहावे. निवडून कसे येतात ते मी बघतोच. जी काही यंत्रणा लावायची ती लावा. जी काही ताकद लावायची ती लावा. जेवढे काही खोके वाटायचे ते वाटा पण एक सुद्धा मत विकलं जाणार नाही. एकही शिवसैनिक विकला जाणार नाही. त्यांना पाडणारच” असं खुलं आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिले आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या