IND vs AUS | सामनाधिकाऱ्यांनी केली रवींद्र जडेजाची चौकशी, पाहा VIDEO

IND vs AUS | नागपूर: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये कसोटी मालिका सुरू आहे. या कसोटी मालिकेमध्ये भारताचा डावखुरा फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) ने तब्बल पाच महिन्यानंतर पुनरागमन केले आहे. कसोटीच्या पहिल्याच दिवशी जडेजाने पाच विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत. पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी रवींद्र जडेजाने 47 धावा देत पाच बळी घेतले आहे. पहिल्या सामन्यानंतर रवींद्र जडेजा अडचणीत सापडला आहे. त्याच्या एका कृतीबद्दल सामनाधिकाऱ्यांकडून त्याची विचारपूस करण्यात आली आहे.

का झाली रवींद्र जडेजाची चौकशी? (Why was Ravindra Jadeja investigated?)

समान्यादरम्यान (IND vs AUS) गोलंदाजी करत असताना रवींद्र जडेजा त्याच्या बोटाला कोणतेतरी लोशन लावत असलेल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटपटूंनी शेअर केला आहे. या व्हिडिओनंतर रवींद्र जडेजा अडचणीत सापडला आहे.

रवींद्र जडेजाचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सामनाधिकारी पायक्राफ्ट यांनी जडेजा आणि भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला याबाबत विचारणा केली आहे. यावेळी अधिकाऱ्यांनी तो व्हिडिओ देखील पाहिला आहे. मात्र, त्यानंतर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही.

मीडिया रिपोर्टनुसार, रवींद्र जडेजा आपल्या बॉलिंग फिंगरला पेन किलर लोशन लावत होता. दीर्घ ब्रेकनंतर रवींद्र जडेजा कसोटी सामना (IND vs AUS) खेळत आहे. त्यामुळे गोलंदाजी करताना त्याला अडथळे निर्माण होत आहे. म्हणून तो बॉलिंग फिंगरला पेन किलर लोशन लावत होता, असे संघ व्यवस्थापनाकडून पायक्राफ्ट यांना सांगण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या