Diabetes | डायबिटीसच्या रुग्णांनी नाश्त्यात करावे ‘या’ पदार्थांचे सेवन, मिळतील अनोखे फायदे

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Diabetes : भारतात डायबिटीज रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मधुमेह हे मूत्रपिंड निकामी होणे, हृदय निकामी होणे, अंधत्व येणे, खालच्या अंगांना इजा होणे आणि पक्षाघाताचे प्रमुख कारण म्हणून ओळखले जाते. या शुगरच्या आजाराला अॅलोपॅथी सारख्या पद्धतींमध्ये उपचार उपलब्ध नाहीत. मात्र अनेक शतकांपासून प्रचलित असणाऱ्या आयुर्वेद शास्त्राने शुगर कशी नियंत्रणात ठेवावी, हे सिद्ध केलेले आहे. त्याचबरोबर तुम्ही आपल्या आहारात काही भाज्या आणि फळांचा समावेश करून मधुमेह नियंत्रणात ठेवू शकतात. कारण रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढल्यास अनेक गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. डायबिटीस नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात आणि जीवनशैलीत बदल करू शकतात. यासाठी तुम्ही तुमच्या नाश्त्यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश करू शकतात.

मेथी पराठा (Methi Paratha For Diabetes)

डायबिटीसच्या रुग्णांसाठी सकाळच्या नाश्त्यात मेथीच्या पराठ्याचे सेवन करणे खूप फायदेशीर ठरू शकते. कारण मेथीच्या पराठ्यात आयरन, प्रोटीन, कॅल्शियम, आणि फायबर यासारखे पोषक घटक आढळून येतात. त्याचबरोबर मेथीमध्ये पुरेशा प्रमाणात विरघळणारे फायबर आढळून येते, जे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. त्यामुळे नाश्त्यामध्ये मेथीच्या पराठ्याचे सेवन करणे डायबिटीसच्या रुग्णांसाठी उपयुक्त ठरू शकते.

दही वडा (Dahiwada For Diabetes)

दही वड्याचे नियमित सेवन केल्याने मधुमेहाची समस्या कमी होऊ शकते. कारण दही वड्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, कॅल्शियम आणि विटामिन बी आढळून येते. त्याचबरोबर दही वड्यामध्ये कॅलरीचे प्रमाण खूप कमी असते. डायबिटीसचे रुग्ण सकाळी दही वड्याचे सेवन करू शकतात. नाश्त्यामध्ये दही वड्याचे सेवन करणे डायबिटीसच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरू शकते.

मोड आलेले धान्य (Spoiled grains For Diabetes)

डायबिटीसच्या समस्येवर मोड आलेले धान्य एक रामबाण उपाय ठरू शकतो. कारण मोड आलेल्या धान्यामध्ये फायबर, फॉलेट, विटामिन के, मॅग्नेशियम, बीटा-कॅरोटीन यासारखे पोषक घटक भरपूर प्रमाणात आढळून येतात. हे घटक रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. त्याचबरोबर नियमित मोड आलेल्या धान्याचे सेवन केल्याने पचन संस्था देखील मजबूत होते.

पोहे (Pohe For Diabetes)

डायबिटीसचे रुग्ण नाश्तामध्ये पोह्याचे सेवन करू शकतात. कारण पोह्यामध्ये फायबर, झिंक, विटामिन बी, कॅल्शियम यांसारखे गुणधर्म आढळून येतात. हे गुणधर्म मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरू शकतात. त्यामुळे पोह्यांचे सेवन करणे या रुग्णांसाठी उपयुक्त ठरू शकते. त्याचबरोबर मधुमेहाच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही आहारात पुढील भाज्यांचा समावेश करू शकतात.

डायबिटीसपासून आराम मिळवण्यासाठी आहारात पुढील भाज्यांचा करा समावेश (Include the following vegetables in your diet to get relief from diabetes)

बीट (Beetroot For Diabetes)

नियमित बीटचे सेवन केल्याने मधुमेहाच्या रुग्णांना आराम मिळू शकतो. कारण डायबिटीसच्या रुग्णांसाठी बीट हे कोणत्याही औषधापेक्षा कमी नाही. नियमित बीटाचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. त्याचबरोबर विटामध्ये उपलब्ध असलेले अल्फा ओलिक ॲसिड रक्तातील हाय ब्लड शुगर लेवल नर्वस सिस्टीमला मजबूत बनवते. त्यामुळे तुम्ही जर मधुमेहाचे रुग्ण असाल, तर तुम्ही नियमित बीटरूटचे सेवन केले पाहिजे.

मुळा (Radish For Diabetes)

मधुमेहाच्या रुग्णांनी हिवाळ्यामध्ये मुळ्याचे सेवन करावे. कारण यामध्ये ग्लुकोसिनोलेट आणि आयसोथिओसायनेट सारखे रासायनिक घटक मुबलक प्रमाणात आढळतात. या दोन्ही गोष्टी रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करू शकतात. त्याचबरोबर मुळा खाल्ल्याने तुमच्या शरीरात नैसर्गिक पद्धतीने अॅडिपोनेक्टिन उत्पादनात वाढ होण्यास मदत होते. हा हार्मोन इन्सुलिनच्या प्रतिकारापासून तुमचे संरक्षण करू शकतो.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या-