Weather Update | ‘या’ तारखेपासून राज्यातील थंडी गायब होणार, पाहा हवामान अंदाज

Weather Update | टीम कृषीनामा: देशातील वातावरणात सध्या सातत्याने बदल होताना दिसत आहे. कुठे थंडी (Cold) तर कुठे अवकाळी पावसाने (Rain) हजेरी लावली आहे. तर, राज्यामध्ये फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून थंडी कमी होत चालली आहे. तापमानाचा पारा दिवसेंदिवस चढत चालला आहे. पुणे, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्याचे कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस वरून 35 अंश सेल्सिअसवर पोहोचण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत पुढच्या आठवड्यापासून म्हणजेच 15 फेब्रुवारीपासून राज्यात हिवाळा संपण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

राज्यामध्ये किमान तापमानात वाढ होताना दिसत आहे. तापमान वाढीमुळे थंडी कमी झाली आहे. त्याचबरोबर कमाल तापमानाचा पारा देखील सातत्याने वाढत चालला आहे. राज्यातील किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाकडून (Weather Update) वर्तवण्यात आली आहे.

एकीकडे राज्यात तापमानात वाढ होत असताना, उत्तर महाराष्ट्रात गारठा कायम आहे. निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. या ठिकाणी 7.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले आहे.

गेल्या 48 तासांमध्ये राज्यातील किमान तापमान 11 ते 19 अंश सेल्सिअस दरम्यान होते. तर जळगाव येथे 10.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. सोलापूरमध्ये राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. या ठिकाणी 35.3 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले आहे. पुढील काही दिवस किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाकडून (Weather Update) देण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या

Diabetes | डायबिटीसच्या रुग्णांनी नाश्त्यात करावे ‘या’ पदार्थांचे सेवन, मिळतील अनोखे फायदे

Indian Navy Recruitment | तरुणांनो लक्ष द्या! भारतीय नौदलात ‘या’ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

CBSE Admit Card | इयत्ता दहावी आणि बारावी CBSE अॅडमिट कार्ड जारी

Skin Care Routine | त्वचा सुंदर आणि तरुण ठेवण्यासाठी झोपण्यापूर्वी करा ‘या’ गोष्टी

Grape Juice | चेहरा निरोगी ठेवण्यासाठी द्राक्षाच्या रसाचा ‘या’ पद्धतीने करा वापर

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.