Share

Nana Patole | “ते मुंबईत येत असतील तर…”; अदाणी प्रकरणावरून नाना पटोलेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

Nana Patole | मुंबई : उद्योजक गौतम अदानी (Gautam Adani) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यातील नाते काय?, असा थेट प्रश्न करत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मंगळवारी संसदेत हल्लाबोल केला होता. अशातच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स येथे वंदे भारत एक्स्प्रेस व एमएमआरडीएच्या कामांचे लोकार्पण आज मोदींच्या हस्ते होत आहे.

दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी नरेंद्र मोदींच्या मुंबई दौऱ्यावरून टीका केली आहे. राहुल गांधी यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर मोदी लोकसभेत देऊ शकलेले नाहीत. मग त्यांनी याच प्रश्नांची उत्तरं मुंबईततरी द्यावीत, असं नाना पटोले यांनी म्हंटल आहे.

नाना पटोलेंची नरेंद्र मोदींवर टीका (Nana Patole Criticized Narendra Modi)

“पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येत असतील तर ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. आमचे नेते राहुल गांधी यांना लोकसभेत काही प्रश्न विचारले आहेत. अदाणी समूहासोबतचे तुमचे संबंध, तुम्ही त्यांना किती कंत्राट दिले? ते तुमच्यासोबत किती दौऱ्यात होते. अगोदरही ते किती वेळा तुमच्या सोबत होते? असे प्रश्न त्यांना विचारण्यात आले. मात्र या प्रश्नांचे त्यांनी उत्तरं दिली नाहीत. त्याची उत्तरं त्यांनी दिली पाहिजेत.” असंही ते यावेळी बोलताना म्हणाले.

राहुल गांधी काय म्हणाले होते?

“मोदी-अदानी यांच्यामध्ये साटेलोटे असून दोघेही एकमेकांना फायदा करून देतात. अदानींनी 20 वर्षांमध्ये मोदींना व भाजपला किती पैसे दिले, असा प्रश्न गांधी यांनी विचारला. मोदी इस्रायलच्या दौऱ्यावर जाऊन येतात आणि संरक्षण क्षेत्रातील अनेक कंत्राटे अदानींच्या कंपन्यांना मिळतात. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना देशातील उद्योगजगत त्यांच्या विरोधात होते. त्या काळात अदानी मोदींच्या पाठीशी उभे राहिले. तेव्हा त्यांचे नाते स्थानिक होते, मग गुजरातव्यापी झाले. मोदी पंतप्रधान झाल्यावर हे नाते राष्ट्रीय झाले, आता तर ते आंतरराष्ट्रीय झाले आहे”, असे राहुल गांधी म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या :

Nana Patole | मुंबई : उद्योजक गौतम अदानी (Gautam Adani) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यातील नाते काय?, असा …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now