Maharashtra Political Crisis | सत्तासंघर्षाची युक्तीवाद पूर्ण; सर्वोच्च न्यायालयाने निकाल ठेवला राखून

Maharashtra Political Crisis | नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला असून गेल्या आठ महिन्यांपासून राज्यातील सत्तासंघर्षावर सुनावणी सुरू होती. या प्रकरणातील निकाल सर्वोच्च न्यायालयानं राखून ठेवला आहे. शिंदे गटाचे वकील आणि ठाकरे गटाच्या वकिलांनी कायदेशीर तथ्य आणि सत्तांतराच्या घटनाक्रमावर जोरदार युक्तिवाद केला. आज ही सुनावणी पूर्ण झाली आहे.

सत्तासंघर्षाचा सस्पेन्स कायम

न्यायालयाने आता याबाबतचा निर्णय राखून ठेवला असून या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालय कधीही निर्णय देणार असल्याचे बोलले जात आहे. हे प्रकरण 7 न्यायमुर्तींच्या घटनापीठाकडे देण्याचा सस्पेन्सही कायम आहे. त्यामुळे न्यायालय थेट निकाल देणार की हे प्रकरण सात जणांच्या खंडपीठाकडे पाठवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

राज्यातील सत्तासंघर्षावर सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, जस्टिस एमआर शाह, जस्टिस कृष्ण मुरारी, जस्टिस हिमा कोहली आणि जस्टिस पीएस नरसिम्हा यांच्या घटनापीठासमोर गेल्या आठ महिन्यांपासून युक्तिवाद सुरू होता. शिंदे गटाचे वकील हरीश साळवे, नीरज कौल आणि मनिंदर सिंग यांनी बाजू मांडली. तर ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला आहे.

सर्वोच्च न्यायालयाकडूनही महत्त्वाची टिप्पणी करण्यात आली. शिंदे गटाकडून बुद्धिबळाच्या खेळाप्रमाणे पुढची खेळी ओळखली गेली. पुढे काय होणार हे शिंदे गटाला माहित होतं, असं सरन्यायाधीश म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

Back to top button