Devendra Fadanvis | “संजय राऊतांनी काँग्रेसची दलाली सोडावी” : देवेंद्र फडणवीस

 

Devendra Fadanvis | बेळगाव : येत्या 10 मे ला कर्नाटकची विधानसभा निवडणूक ( Karnatka Assembly Election ) पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर जोरदार प्रचार देखील सुरू आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील कर्नाटक मधील काही ठिकाणी सभा घेत प्रचार केला. तर कर्नाटकच्या या निवडणुकीकडे सर्वांनाचचं लक्ष लागलं आहे. कालपासून (3 मे) ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत ( Sanjay Raut) हे बेळगाव दौऱ्यावर आहेत. त्यांनी शिंदे- फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. यामुळे आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी राऊतांवर पलटवार करत चांगलंच सुनावलं आहे.

मराठी भाषिकांच्या पाठीमागे मी आणि भाजपही आहे : देवेंद्र फडणवीस

संजय राऊतांच्या ( Sanjay Raut) वक्तव्यावर उत्तरं देताना फडणवीस म्हणाले की, संजय राऊत यांनी जर काँग्रेसची दलाली सोडली तर मी या ठिकाणी येणार नाही. ते फक्त काँग्रेसची दलाली करण्यासाठी याठिकाणी येत आहेत. काँग्रेस च्या सांगण्यावरून आमची मत कमी करण्यासाठी. तसचं मी आणि भाजपही येथील मराठी भाषिकांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत.
तसचं त्यांनी विलासराव देशमुखांनी उदाहरण देखील दिल. जेव्हा विलासराव देशमुख हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तेव्हा ते काँग्रेसचे इनचार्ज देखील होते. त्यांनी त्यावेळी कर्नाटकमध्ये फिरून प्रचार केला होता तसाच मी माझ्या पक्षाची भूमिका मांडण्यासाठी या ठीकाणी आलो असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

( BJP and devendra fadanvis stand behind Marathi speakers )

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांची आज बेळगाव या ठिकाणी सभा होणार आहे. तसचं संजय राऊत यांच्या मुद्द्याला आता शरद पवार साहेबांनी आपल्या पुस्तकातून उत्तर दिलेलं आहे असं देखील फडणवीस म्हणाले. तर राऊतांनी शिंदे- फडणवीस सरकारला आव्हान देत म्हटलं होत की, ‘जर तुम्ही खरंच बेळगावमधील मराठी भाषिकांच्या पाठीशी आहात तर बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रचारासाठी शिंदे- फडणवीस सरकारने यावं’ या आव्हानाला देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार करत उत्तरं दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

Back to top button