Job Vacancies | महावितरण कंपनीमध्ये ‘या’ पदाच्या रिक्त जागा, आजच करा अर्ज

Job Vacancies | टीम महाराष्ट्र देशा: नोकरीची संधी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी खुशखबर आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण), जळगाव यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या भरती प्रक्रियेमध्ये इच्छुक उमेदवार 24 फेब्रुवारी 2023 पर्यंत अर्ज करू शकतात.

महावितरण यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Vacancies) तब्बल 140 पदे भरण्यात येणार आहे. यामध्ये वीजतंत्री, तारतंत्री आणि संगणक ऑपरेटर या पदांचा समावेश आहे. या पदांसाठी पात्रताधारक उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावे लागणार आहे.

या भरती मोहिमेमध्ये (Job Vacancies) अर्ज करणाऱ्या उमेदवाराने किमान दहावी इयत्ता परीक्षेसह आयटीआय अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा. या पदांच्या शैक्षणिक पात्रता, वय आणि इतर तपशीलांबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date to apply)

या भरती प्रक्रियेमध्ये (Job Vacancies) इच्छुक उमेदवाराला दिनांक 24 फेब्रुवारी 2023 पर्यंत पोहोचतील अशा वेताने अर्ज पाठवणे आवश्यक आहे. उमेदवाराला पुढील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)

लघु प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, मंडळ कार्यालय, विद्युत भवन, एमआयडीसी, जळगाव, पिनकोड- ४२५००३

अधिकृत वेबसाइट

मुख्य पृष्ठ

जाहिरात पाहा

https://drive.google.com/file/d/1r2Np8DHIc7-MXFnVYJ3zHHNGACWMMxrE/view

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.