Share

Job Opportunity | सरकारी नोकरीची संधी! केंद्र शासनाच्या ‘या’ विभागात रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

🕒 1 min read Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकार तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करून देत आहे. केंद्र सरकारच्या गृह मंत्रालय अधिनस्त असलेल्या विविध केंद्रीय सशस्त्र पोलीस दल यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर जाहिरातीतील दिलेल्या पदानुसार पात्रताधारक … Read more

Published On: 

🕒 1 min read

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकार तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करून देत आहे. केंद्र सरकारच्या गृह मंत्रालय अधिनस्त असलेल्या विविध केंद्रीय सशस्त्र पोलीस दल यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर जाहिरातीतील दिलेल्या पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे. इच्छुक उमेदवार या पदांसाठी आजपासूनच अर्ज करू शकतात.

केंद्र शासनाच्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) एकूण 297 रिक्त पदे भरण्यात येणार आहे. यामध्ये सुपर स्पेशालिस्ट वैद्यकीय अधिकारी, विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी पदाच्या रिक्त जागा आहे. या भरती प्रक्रियेसाठी पात्रताधारक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) पदानुसार वेगवेगळे शैक्षणिक पात्रता ठरवण्यात आली आहे. शैक्षणिक पात्रता, वय आणि इतर तपशीलांबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवार http://www.itbpolice.nic.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाउनलोड करून बघू शकतात.

अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date to apply)

इच्छुक उमेदवार या भरती प्रक्रियेमध्ये 16 मार्च 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेबद्दल (Job Opportunity) सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार http://www.itbpolice.nic.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

जाहिरात पाहा

https://drive.google.com/file/d/1OgRjXegoNjYOO9ngyXyj93Z0wFr-dxAG/view

अधिकृत वेबसाइट

https://www.itbpolice.nic.in/

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही