Job Opportunity | गोव्यात नोकरीची संधी! ‘या’ संस्थेत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: देशामध्ये दिवसेंदिवस बेरोजगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध संस्था तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करून देत असतात. अशात गोवा डेंटल कॉलेज आणि रुग्णालय (Goa Dental College and Hospital) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येणार आहे.

गोवा डेंटल कॉलेज आणि रुग्णालय यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 6 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये स्टाफ नर्स आणि क्ष-किरण तंत्रज्ञ पदांच्या रिक्त जागा आहेत.

या भरती प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रतेबद्दल बोलायचे झाले, तर या भरती प्रक्रियेमध्ये पदानुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता ठरवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रता आणि इतर तपशिलांबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात किंवा खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

मुलाखतीची तारीख (Date of Interview)

या भरती प्रक्रियेतील मुलाखतीसाठी इच्छुक उमेदवारांना दिनांक 27 फेब्रुवारी 2023 रोजी स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे. इच्छुक उमेदवारांना मुलाखतीसाठी पुढील पत्त्यावर उपस्थित राहावे लागणार आहे.

मुलाखतीचा पत्ता (Address of interview)

डीन कार्यालय, गोवा दंत महाविद्यालय आणि रुग्णालय, बांबोलीम, गोवा.

जाहिरात पाहा

https://drive.google.com/file/d/1Kd_m7eUGNztqHWCvAh78SnnrFsGKMedk/view

अधिकृत वेबसाइट

https://gdch.goa.gov.in/

महत्वाच्या बातम्या