Job Opportunity | 12 उत्तीर्ण असलेल्यांसाठी ‘या’ बँकेत नोकरीची संधी

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: बँकेच्या परीक्षेची तयारी करत असलेल्या किंवा बँकेमध्ये नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पुणे पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांच्यामार्फत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या पदांसाठी इच्छुक आणि पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवार आजपासूनच ऑनलाईन अर्ज करू शकतात.

पुणे पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांच्यामार्फत सुरू झालेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) ऑफिस ऑपरेशन एक्झिक्युटिव्ह (बॅक ऑफिस) / Office Operation Executive (Back Office) पदाच्या 2 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या रिक्त जागांबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) अर्ज करणारा उमेदवार किमान मान्यताप्राप्त संस्थेतून बारावी उत्तीर्ण असावा. शैक्षणिक पात्रतेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज भरताना उमेदवाराला कोणत्याही प्रकारची फी भरावी लागणार नाही.

या भरती प्रक्रियेच्या (Job Opportunity) माध्यमातून निवड झालेल्या उमेदवाराला 7000 रुपये ते 20000 रुपयापर्यंत वेतन मिळू शकते. निवड झालेल्या उमेदवारांना पुण्यामध्ये नोकरी करावी लागणार आहे. या भरती प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

अधिकृत वेबसाईट

www.punepeoplesbank.com

जाहिरात पाहा

https://www.apprenticeshipindia.gov.in/apprenticeship/opportunity-view/63f341cf788717146b45f76a

महत्वाच्या बातम्या