Share

Job Opportunity | ठाण्यात नोकरीची संधी! ‘या’ संस्थेमध्ये 41 रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू

🕒 1 min read Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: वैद्यकीय क्षेत्रामध्ये नोकरी शोधत असलेल्या पात्रताधारक उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय, ठाणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) तसेच विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात आले आहे. पात्रताधारक उमेदवारांसाठी … Read more

Published On: 

🕒 1 min read

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: वैद्यकीय क्षेत्रामध्ये नोकरी शोधत असलेल्या पात्रताधारक उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय, ठाणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) तसेच विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात आले आहे. पात्रताधारक उमेदवारांसाठी ही एक उत्तम नोकरीची संधी आहे.

महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय, ठाणे यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) वैद्यकीय अधिकारी पदाच्या एकूण 41 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदांबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, पगार, वय आणि इतर तपशिलांबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाउनलोड करून बघू शकतात.

या भरती मोहिमेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवारांना दिनांक 26 फेब्रुवारी 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवणे आवश्यक आहे. इच्छुक उमेदवार पुढील ईमेलवर ऑनलाईन पद्धतीने आणि पुढील पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवू शकतात.

अर्ज पाठवण्यासाठी ई-मेल ऍड्रेस

moesisthane@gmail.com

अर्ज पाठवण्याचा पत्ता

वैद्यकीय प्रशासन अधिकारी, महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी, स. नं. ६८९/९०, पंचदीप भवन, तळमजला, बिबवेवाडी, पुणे ४११०३७

अधिकृत वेबसाईट

https://www.esic.gov.in/

जाहिरात पाहा

https://drive.google.com/file/d/11Fgg__9pN8-PKA-lTqgbwsWh24lcN5pX/view

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही