Kapil Sibal | “राज्यपालांनी बहुमत न पाहताच महाराष्ट्रात पहाटेच्या शपथविधीला संमती कशी दिली?”

Kapil Sibbal | नवी दिल्ली : शिवसेनेचा (Shivsena)  वाद केंद्रीय निवडणूक आयोगानंतर आता सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहचला आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये एकनाथ शिंदे यांची बंडखोरी आणि शिवसेना पक्षावर दावा ठोकणं किती अवैध आहे, हे पटवून देण्यासाठी ठाकरे गटाकडून जोरदार युक्तिवाद सुरु आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत (Maharashtra Political Crisis) आजपासून तीन दिवस सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद सुरु असताना माजी राज्यापाल भगतसिंह कोश्यारी यांच्या कामकाजावरुन प्रश्न केला आहे.

गेल्या तासाभरापासून सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) याबाबत सुनवणी सुरू आहे. यातच कपिल सिब्बल (Kapil sibbal)  यांनी युक्तिवादात एक गंभीर मुद्दा मांडला आहे. राज्यपालांच्या हेतूंबद्दल शंका यावी अशा पद्धतीने निर्णय घेतले गेले, त्यातूनच बहुमत चाचणीपूर्वी उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray)  राजीनामा दिला असा दावा सिब्बल यांनी केला आहे.

कपिल सिब्बल काय म्हणाले?

ठभगतसिंह कोश्यारी हे महाराष्ट्राच्या राज्यपालपदी होते त्यावेळी त्यांनी बहुमत आहे की नाही? हे न पाहताच त्यांनी सरकार स्थापन करण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना कसं काय निमंत्रण दिलं ? असा प्रश्न विचारत कपिल सिब्बल यांनी राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. पहाटेचा शपथविधी सध्या चर्चेत आहे. हाच मुद्दा कपिल सिब्बल यांनी कोर्टात मांडला. एवढंच नाही तर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा हेतू माहित असल्यानेच उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपद सोडलं”, असंही कपिल सिब्बल यांनी म्हणाले आहेत.

माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या भूमिकेवर न्यायालयात प्रश्न उपस्थित होण्याआधीच या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. भगतसिंह कोश्यारी यांनी विविध प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. अजित पवार हे माझ्याकडे आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र घेऊन आले होते. त्यांनी मला हे खात्रीशीर रित्या सांगितलं होतं की, आमच्याकडे बहुमत आहे त्यामुळे मी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना शपथ घेण्याची संमती दिली.

राज्यपालपदी असताना तुमच्याकडे असलेल्या आमदारांची परेड करा हे सांगण्याचा अधिकार मला नाही, त्यामुळे मला त्यांनी जे पत्र दाखवलं ते पाहून मी त्यांना शपथ दिली होती. त्यानंतर ते बहुमताची संख्या गाठू शकले नाहीत. त्यामुळे ते सरकार 72 तासांमध्ये पडलं असे भगतसिंह कोश्यारींनी म्हणाले.

Kapil Sibbal’s big Argument in Supreme Court

आसामला गेलेल्या आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय झाला असता तर, अध्यक्ष निवडीचा निकाल वेगळा लागला असता, असंही सिब्बल यांचं म्हणणं आहे. सुरुवातीच्या टप्प्यातच ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी सदस्यांच्या अपात्रतेबाबत आधी निर्णय घेण्याची मागणी लावून धरली आहे. तसंच राज्यपालांच्या अधिकारांवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. तसंच प्रतोद पद, गटनेतेपद, पहाटेचा शपथविधी याबाबत त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. आसाममधून आमदारांनी घेतलेल्या निर्णयाच्या वैधतेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. तसंच स्वतःला जर शिवसेनेचे घटक मानत असाल तर पक्षाचा व्हिप का डावलला, असा सवाल कपिल सिबल यांनी उपस्थित केला आहे.

महत्वाच्या बातम्या-