Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल (ITBP) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीत दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेमध्ये इच्छुक उमेदवार दिनांक 20 फेब्रुवारी 2023 पासून अर्ज करू शकतात.
इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) – स्पोर्ट्स कोटा या पदाच्या एकूण 71 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदांबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.
या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून समतुल्य उत्तीर्ण केलेला असावा. या भरती प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रता आणि इतर तपशीलांबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.
महत्वाच्या तारखा (Important dates)
या भरती प्रक्रियेसाठी (Job Opportunity) वय वर्ष 18 ते 25 पर्यंत असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज प्रक्रिया दिनांक 20 फेब्रुवारी 2023 पासून सुरू होणार आहे. तर इच्छुक उमेदवार या पदांसाठी दिनांक 21 एप्रिल 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
अधिकृत वेबसाइट
महत्वाच्या बातम्या
- Papaya Benefits | फक्त पोटासाठीच नाही तर त्वचेसाठी देखील खूप फायेशीर आहे पपई, जाणून घ्या सविस्तर
- Job Opportunity | सरकारी नोकरीची संधी! शासनाच्या ‘या’ विभागात रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
- Weather Update | पहाटे हुडहुडी तर दुपारी घामाच्या धारा, पाहा हवामान अंदाज
- Supriya Sule | फडणवीसांनी केलेल्या दाव्यावर आता सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या, “त्यांना सध्या फक्त…”
- Sanjay Raut | “ते रहस्य फडणवीस कधीच सांगू शकत नाहीत”; फडणवीसांच्या दाव्यावर राऊतांचं सडेतोड उत्तर