Weather Update | पहाटे हुडहुडी तर दुपारी घामाच्या धारा, पाहा हवामान अंदाज

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील वातावरणात पुन्हा एकदा बदल झाला आहे. राज्यात दिवसाच्या कमाल तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तर दुसरीकडे पहाटेच्या किमान तापमानात घट होत चालली आहे. त्यामुळे पहाटे गारवा आणि दुपारी उन्हाच्या तीव्र झळा जाणवत आहे. राज्यातील किमान आणि कमान तापमानातील (Weather Update) चढ-उतार कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

राज्यात उन्हाचा तडाका वाढल्यामुळे दुपारच्या वेळी तापमानाचा पारा 35 अंश सेल्सिअसपर्यंत जात आहे. तर पहाटेच्या वेळी राज्यातील तापमान 10 अंश सेल्सिअसच्या (Weather Update) खाली नोंदवण्यात येत आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रासह राज्यात काही भागात थंडी कायम आहे.

देशात मंगळवारी (14 फेब्रुवारी) रत्नागिरी येथे उच्चांकी तापमानाची (Weather Update) नोंद झाली आहे. रत्नागिरीमध्ये 38.3 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले आहे. तर निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. या ठिकाणी 6.14 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले आहे.

विदर्भ आणि मराठवाड्यातील तापमानात घट (Temperature drop in Vidarbha and Marathwada)

विदर्भ आणि मराठवाड्यातील तापमानात (Weather Update) मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात कमाल तापमानात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये किमान तापमानात घट कायम आहे. धुळे येथील कृषी महाविद्यालयात 6.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले आहे. पुण्यामध्ये 9.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

महत्वाच्या बातम्या

Back to top button