Papaya Benefits | फक्त पोटासाठीच नाही तर त्वचेसाठी देखील खूप फायेशीर आहे पपई, जाणून घ्या सविस्तर

Papaya Benefits | पपई आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. त्याचबरोबर पपई त्वचेसाठी (Skin Care) देखील उपयुक्त ठरू शकते. कोरड्या त्वचेला (Dry Skin) आतून हायड्रेट ठेवण्यासाठी पपईचा उपयोग केला जाऊ शकतो. त्याचबरोबर पपई सेल्युलर नुकसानापासून देखील संरक्षण करू शकते. पपईमध्ये आढळणारे अँटीऑक्सिडेंट गुणधर्म त्वचेची काळजी घेण्यास मदत करतात. त्याचबरोबर पपईमध्ये आढळणारे विटामिन ई आणि सी चेहऱ्याला आतून चमकदार बनवतात.

चेहऱ्यावर पपईचा वापर कसा करायचा? (How to use papaya on the face?)

पपई आपल्या आरोग्यासोबत त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर आहे. त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्हाला एक पपई घेऊन ती किसून घ्यावी लागेल. त्यानंतर त्यामध्ये थोडेसे गुलाब जल मिसळून घ्यावे लागेल. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही या मिश्रणामध्ये कोरफड देखील मिसळू शकतात. हे मिश्रण व्यवस्थित तयार झाल्यावर तुम्हाला ते साधारण दहा मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. या मिश्रणामुळे त्वचा सुंदर आणि चमकदार होऊ शकते. त्याचबरोबर या मिश्रणाच्या मदतीने त्वचेवरील फ्रिंकल्स आणि सुरकुत्या देखील कमी होऊ शकतात.

पपईचे चेहऱ्यावर फायदे (Benefits of papaya on the face)

पपईचे चेहऱ्याला अनेक फायदे मिळतात. त्वचेला आतून हायड्रेट ठेवण्यास पपई मदत करते. त्याचबरोबर पपईच्या वापराने पिगमेंटेशनची समस्या देखील कमी होऊ शकते. पपईचा फेस पॅक चेहऱ्यावर लावल्याने पिंपल्स, काळे डाग इत्यादी समस्या दूर होऊ शकतात.

पपईचे फायदे (Papaya Benefits)

  • पपईमध्ये भरपूर प्रमाणात विटामिन ए आणि सी आढळून येते. त्यामुळे नियमित पपईचे सेवन केल्याने शरीरातील विटामिन ए आणि सीची कमतरता भरून निघते.
  • पपईच्या मदतीने त्वचेवरील काळे डाग दूर होऊ शकतात. त्याचबरोबर पपई त्वचेवरील वृद्धत्वाची लक्षणे कमी करते.
  • पपईमध्ये फ्लेव्होनॉइड्स कोलेजन आढळून येते, जे त्वचा मुलायम आणि चमकदार बनवण्यास मदत करते.
  • पपईच्या मदतीने डेड सेल्स कमी होऊ शकतात. त्याचबरोबर पपई त्वचेचा टोन सुधारण्यास मदत करते.
  • पपईच्या मदतीने जळलेल्या त्वचेला आराम मिळू शकतो. त्याचबरोबर काळे डाग दूर करण्यासाठी पपई उपयुक्त आहे

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

Bitter Gourd | कारल्याचे नियमित सेवन केल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे

Back to top button