IPL 2024 Schedule | ठरलं तर मग! IPL चा पहिला सामना ‘या’ दिवशी होणार

IPL 2024 Start On 22 March To 26 May

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

IPL 2024 Schedule | भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) IPL 2024 साठी २२ मार्च ते २६ मे दरम्यान आयोजित करण्याचे ठरवले आहे.

या वर्षी देशात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणूकांची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. याचा परिणाम आयपीएलवर होतांना दिसून येत आहे.

महिला प्रीमियर लीग ( WPL )२२ फेब्रुवारीपासून सुरू होणार असल्याचे बोलले जाते. WPL चा अंतिम सामना १७ मार्च रोजी खेळवला जाऊ शकतो.

यानंतर लगेच पाच दिवसांनी आयपीएल ( IPL 2024 ) सुरू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. IPL 2024 स्पर्धेचा पहिला सामना २२ मार्च रोजी तर अंतिम सामना २६ मे रोजी खेळवण्यात येणार असल्याची शक्यता आहे.

IPL 2024 Schedule | IPL Start On 22 March To 26 May

देशात काही महिन्यांवर लोकसभा निवडणुका आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे. या कारणास्तव, आयपीएलचे संपूर्ण वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही.

BCCI २२ मार्च ते २६ मे अखेरपर्यंत आयपीएल २०२४ चे आयोजन करू शकते. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्यानंतरच आयपीएलचं ( IPL 2024 ) वेळापत्रक जाहीर केलं जाण्याची शक्यता आहे.

आयपीएलच्या १६ व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सचा पराभव करून पाचव्यांदा विजेतेपद पटकावले होते.

ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज, अफगाणिस्तान, झिम्बाब्वे आणि न्यूझीलंडचे खेळाडूही आयपीएलसाठी उपलब्ध असणार आहेत.