Rohit Sharma | रोहित शर्माला मुंबई इंडियन्सने पुन्हा डावलले; फॅन्स झाले नाराज

Rohit Sharma | मुंबई । इंडियन प्रीमियर लीग ( Indian Premier League )  2024 ची तयारी सुरू झाली आहे. आयपीएलच्या येत्या हंगामासाठी सर्व संघ सुसज्ज होत आहे.

त्याचबरोबर आयपीएल 2024 मध्ये आपल्याला अनेक संघात बदल झालेले दिसणार आहे. सर्वात मोठा बदल गुजरात टायटन्स ( Gujarat Titans )  आणि मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians ) मध्ये झालेला दिसून येणार आहे.

Hardik Pandya has joined Mumbai Indians

मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला कर्णधार केले, त्यामुळे मुंबई इंडियन्सने फॅन्स नाराज झाले होते. फॅन्सने मुंबई इंडियन्सची ( Mumbai Indians ) जर्सी जाळत निषेध नोंदवला होता

आयसीसी वर्ल्डकपदरम्यान हार्दिकच्या (Hardik Pandya) टाचेला दुखापत झाली होती, तेव्हापासून तो मैदानाबाहेर होता. अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिका पांड्या खेळाला नव्हता. तसेच तो आयपीएल खेळणार नसल्याच्या  चर्चा रंगल्या होत्या.

यामुळे मुंबई इंडियन्सचे नेतृत्व पुन्हा एकदा रोहित शर्माकडे ( Rohit Sharma ) येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार, हार्दिक सध्या दुखापतीतून सावरत असून आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे.

Hardik Pandya replaces Rohit Sharma as Mumbai Indians captain For IPL 2024

हार्दिक दुखापतीतून पूर्णपणे सावरला असून तो दररोज सराव करत असल्याची माहिती आहे.  त्यामुळे हार्दिक खेळणार की नाही मुंबईचे नेतृत्व कोण करणार? या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

हार्दिक पांड्याने ( Hardik Pandya ) गुजरात टायटन्स ( Gujarat Titans ) ची साथ सोडलेली असून तो पुन्हा एकदा मुंबई इंडियन्समध्ये सामील झाला आहे.

Rohit Sharma IPL Stats Vs Hardik Pandya IPL Stats

रोहितने ( Rohit Sharma ) २४३ सामन्यात ६२११ धावा केल्या आहेत. त्यात एक शतक, ४२ अर्धशतके, ५५४ चौकार आणि २५७ षटकार आहेत. रोहितने IPL मध्ये १५ विकेट घेतल्या आहेत.

हार्दिकने १२३ सामन्यात २३०९ धावा केल्या आहेत. त्यात शून्य शतक, १० अर्धशतके, १७२ चौकार आणि १२५ षटकार आहेत. गोलंदाजीमध्ये हि हार्दिकने मोठी कामगिरी केलेली नाही आहे. त्याने १२३ सामन्यात ५३ विकेट घेतल्या आहेत.

आकड्यावरून लक्षात येते रोहित शर्माची ( Rohit Sharma ) कामगिरी हार्दिक पंड्या पेक्षा चांगली आहे.

रोहित शर्मा मुंबईचा सर्वात यशस्वी कर्णधार 

रोहित ( Rohit Sharma ) 2011 पासून मुंबई इंडियन्स संघासाठी खेळतो आहे. तसेच 2013 पासून तो संघाचा कर्णधार आहे. रोहितच्या ( Rohit Sharma ) नेतृत्वात मुंबईने २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० मध्ये विजेतेपद पटकावलं आहे.

रोहितने १६३ सामन्यांमध्ये MI चे नेतृत्व करताना ९१ सामन्यात विजय मिळवला आहे. तर ६८ सामने गमावले असून ४ सामने बरोबरीत सुटले आहेत.

IND vs ENG Test 2024 Schedule

इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेला 25 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे.इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका सुरु होणार आहे. इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी रोहित ( Rohit Sharma ) कर्णधार असणार आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचही कसोटी सामने भारतात खेळवले जाणार आहेत. सर्व खेळ भारतीय वेळेनुसार सकाळी 9:30 AM वाजता सुरू होतील.

तारीख ठिकाण वेळ
पहिला सामना25 ते 29 जानेवारीहैदराबादसकाळी 9:30 AM
दुसरा सामना2 ते 6 फेब्रुवारीविशाखापट्टणमसकाळी 9:30 AM
तिसरा सामना15 ते 19 फेब्रुवारीराजकोटसकाळी 9:30 AM
चौथा सामना23 ते 27 फेब्रुवारीरांचीसकाळी 9:30 AM
पाचवा सामना7 ते 11 मार्चधर्मशालासकाळी 9:30 AM

When and Where to watch the IND vs ENG Test series on television?

IND vs ENG कसोटी सामने टीव्ही वर तुम्ही Sports 18 नेटवर्कवर पाहू शकता.

Live streaming IND vs ENG Test series

भारत विरुद्ध इंग्लंड लाइव्ह स्ट्रीमिंग भारतात जिओ सिनेमा अॅप वर तुम्ही पाहू शकाल.

IND vs ENG Test series Squad

India Squad:  अजून घोषणा नाही

England Squad: बेन स्टोक्स (कर्णधार), हॅरी ब्रूक, झॅक क्रॉली, बेन डकेट, जो रूट, रेहान अहमद, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स, ऑली पोप, जेम्स अँडरसन, गस ऍटकिन्सन, शोएब बशीर, टॉम हार्टले, जॅक लीच, ऑली रॉबिन्सन , मार्क वुड.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.