🕒 1 min read
Ayodhya Ram Mandir | अयोध्येत प्रभू श्रीरामांचं भव्य असं मंदिर उभारलं जात आहे. या मंदिराचं बांधकाम अद्याप पूर्ण झालेलं नाही, असे असतांना मंदिरात प्राणप्रतिष्ठा ( Ayodhya Ram Mandir ) करण्यास अनेकांनी विरोध केला आहे.
अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम अर्धवट आहे ते पूर्ण होण्यास आणखी तीन वर्षे लागणार आहेत परंतु निवडणुकीच्या तोंडावर राजकीय फायदा उठवण्यासाठी अर्धवट बांधकाम असलेल्या मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्याची घाई भाजपाला झाली असल्याचा आरोप विरोधक करत आहेत.
Ayodhya Ram Mandir will be inaugurated on January 22
येत्या 22 जानेवारीला राम मंदिराचं ( Ayodhya Ram Mandir ) उद्घाटन होणार आहे. राम मंदिरासाठी जगभरातील रामभक्तांकडून वेगवेगळ्या भेटवस्तू दिल्या जात आहे. मुस्लीम बांधवांनी देखील राम मंदिराला काश्मीर वरून भेटवस्तू पाठवली आहे.
Kashmir Muslim People Give Kesar Gift To Ayodhya Ram Mandir
22 जानेवारीला रामलल्ला ( Ayodhya Ram Mandir ) यांची मंदिरात प्राण प्रतिष्ठा होणार आहे. रामलल्ला यांची मूर्ती मंदिराच्या गर्भगृहात आणण्यात आली आहे. राममहोत्सावाला सुरुवात झाली आहे. संपूर्ण अयोध्यानगरी सजवण्यात आली आहे. देशातील आणि जगभरातील हजारो भाविक अयोध्येत दाखल होत आहेत.
मुस्लीम बांधवांनी रामलल्लाच्या सेवेसाठी विशेष ऑर्गेनिक केसर गिफ्ट केलं आहे. काश्मीरहून आणलेले दोन किलो केसर रामलल्ला यांच्या सेवेसाठी भेट म्हणून दिलं.
महत्वाच्या बातम्या
- T20I World Cup 2024 | वर्ल्ड कपसाठी 10 खेळाडूंची नावं जाहीर; वाचा संपूर्ण माहिती
- Ayodhya Ram Temple | रामलल्लाचा पहिला फोटो, मंदिराच्या गर्भगृहातून झलक
- Kunbi Certificate | २ दिवसांत कुणबी प्रमाणपत्र देणे शक्य नाही; सरकार मराठ्यांना फसवतंय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











