Kunbi Certificate | २ दिवसांत कुणबी प्रमाणपत्र देणे शक्य नाही; सरकार मराठ्यांना फसवतंय

It is not possible to issue Kunbi certificate within 2 days; The government is cheating the Marathas

टीम महाराष्ट्र देशा | Kunbi Certificate  । मनोज जरांगे यांनी मराठ्यांना आरक्षण मिळावे, यासाठी अंतरवली सराटी येथे आंदोलन सुरु केले होते. आंदोलकांना पोलिसांकडुन लाठीमार झाला आणि मराठा आंदोलन राज्यभर उभे राहीले. आत्तापर्यंत मिळु न शकलेल्या आरक्षणाच्या अनुषगाने पुन्हा एकदा मराठा समाज मैदानात उतरला आहे.

‘महाराष्ट्र देशा’च्या बातमीनंतर सरकारच्या गोडी गुलाबीला भुललेले जरांगे यांनी आज कठोर भूमिका घेत सरकारला ठणकावले. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र ( Kunbi Certificate )  लवकरात लवकर मिळावे, यासाठी त्यांनी सरकारला आज धारेवर धरले आहे. मागील महिनाभरापासून ४० लाखाच्या वर कुणबी नोंदी सापडल्याचे सरकार सांगत आहे.

ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना त्वरित कुणबी प्रमाणपत्राचे वाटप केले जाईल, असेही सांगण्यात आलेले आहे. मात्र प्रत्याक्षात हजारांचा आकडाही पार न केल्याचा संशय व्यक्त होत आहे.

It is not possible to issue Kunbi certificate within 2 days

दरम्यान, सरकार पुन्हा: मनोज जरांगे यांना किंबहुना मराठ्यांना फसवत असल्याचे चित्र समोर येत आहे. येत्या दोन दिवसांत मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या असे सरकार सांगत जरी असले तरी ते शक्य नाही. जे ४५ दिवसांत शक्य झाले नाही ते २ दिवसांत कसे शक्य होईल, असा मोठा प्रश्न उभा आहे.

ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या त्यांनी सरकार दरबारी कुणबी प्रमाणपत्र ( Kunbi Certificate ) काढण्यासाठी योग्य ती कागदपत्रे देऊन पाठपुरावा ही केलेला आहे. तरीही सरकारमधील obc मंत्र्यांच्या दबावामुळे प्रमाणपत्राचे वाटप थांबले आहे. असा आरोप आता मराठा समाजाच्या वतीने केला जात आहे.

हे वास्तव थेट मराठा आंदोलक जरांगे यांनी आज पत्रकार परिषदेत विशद केले. या प्रकाराबद्दल जरांगे यांनी सरकारच्या भूमिकेबद्दल कडाडून टीका केली. जरांगे यांच्या रोषानंतर  शासनाकडून तातडीने प्रमाणपत्र देण्याची घोषणा झाली.

मात्र, २ दिवसामध्ये ५० लाखाहून अधिक सापडलेल्या कुणबी नोंदीचे प्रमाणपत्र ( Kunbi Certificate ) देणे ही  अशक्य बाब वाटते आहे. कारण जे प्रमाणपत्र ४५ दिवसात वाटप होऊ शकले नाही, ती प्रमाणपत्रे २ दिवसात कशी वाटप करणार?

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.