Explained | मराठे मराठा आरक्षणाची हरलेली लढाई लढत आहेत

Explained Marathas are fighting a losing battle for Maratha reservation

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Maratha reservation | मराठा आरक्षणावर मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे आंदोलन सुरू केल्यानंतर त्याठिकाणी पोलिसांकडुन लाठीमार झाला आणि राज्यभर आंदोलने उभे राहीले. आत्तापर्यंत मिळु न शकलेल्या आरक्षणाच्या अनुषगाने पुन्हा एकदा समाज मैदानात उतरला आहे. माञ, समाजाच्या पदरात खरच काही पडणार आहे, की मराठे आरक्षणाची हरलेली लढाई पुन्हा लढत आहेत, असा प्रश्न उपस्थीत केला जात आहे.

सध्या एकमेव चर्चेत असलेले मराठा आरक्षणाचे आंदोलन सुरवातीला जालना जिल्हा, कालांतराने मराठवाड्या पुरते मर्यादित होते. अंतरवाली सराटीत पोलिसाच्या लाठी हल्ल्यानंतर या आंदोलनाचे लोण राज्यभर पसरले.

हा प्रसंग लक्षात घेत महाराष्ट्रातील शरद पवार, राज ठाकरे, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले, उदयनराजे भोसले, छञपती संभाजीराजे यांच्यासह महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांनी भेटी दिल्या. माञ, महाराष्ट्रात दादा म्हणून ओळख असणारे नेते  आणि मराठा आंदोलनावर टीका करणारे आंदोलनाकडे फिरकले नाहीत.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस लाठी हल्लानंतर अगोदर माफी मागितली नंतर मराठा आंदोलकांवर कारवाई सुरु केलेली आहे. मराठा आंदोलन शांत झाल्यावर विधानसभेत भाषण करताना मराठा आंदोलनावर टीका केली.

आंदोलनानंतर प्रसिद्धीच्या झोतात आलेले जरांगे पाटील आणि मराठा आंदोलन महाराष्ट्रभर पसरले.  हे आंदोलन जसे-जसे व्यापक होत असतानाच जवळच्या लोकांना विश्वासात न घेतल्याने जरांगे पाटील यांच्याजवळील बरीच लोक दुरावत चालली आहेत.

समाजाचे भले होत असेल तर आपण शांत बसू या कारणाने हे लोक शांत बसले आहेत. जगभरात सुसंकृत आणि उच्च शिक्षित अशी ओळख असलेल्या मराठा समाजाची मान शरमेने खाली जाईल, असे जरांगे पाटील वागत आहेत.

त्याला कारण म्हणजे जरांगे पाटील लोकप्रतिनिधी यांच्या बद्दल बोलताना एकेरी उल्लेख करतात. तो केवळ लोकप्रतिनिधी यांचा अवमान त्यांना निवडणुकीत कौल देणाऱ्या, मतदान करणाऱ्या लाखो जनतेचा अवमान होत आहे.

या अनुषंगाने उलट-सुलट चर्चा होत असतानाही जरांगे आपली भाषा बदलायला तयार नाहीत. मराठवाड्याची भाषा ही एकेरी उल्लेखाची असल्याचा अपप्रचार काही जरांगे समर्थक करत आहेत.

मराठवाड्याच्या भाषेला वेगळी परंपरा आहे. सर्वाधिक साधू संत देखील याच भूमीत जन्माला आले आहे. त्यांचे साहित्य जगभर वाचल्या जात आहे. आपल्या मराठवाडी भाषेतून कुणाच्याही अवमान होणार नाही याची काळजी देखील त्यांनी आपल्या लिखाणात घेतलेली आहे.

अशा एकेरी उल्लेखामुळेच त्याच्या मागे उभा असलेला मराठा समाज दुरावत चालला आहे. समाज जो निर्णय घेईल, तोच आपण घेतो, असे ‘ते’ म्हणतात. पण, समाजातील किती लोकांना ते विचारून निर्णय घेतात, हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरीत आहे.

Marathas are fighting a losing battle for Maratha reservation

हे आंदोलनं आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांची टीम हॅण्डल करत असल्याची माहिती समोर येते आहे. एवढेच काय तर मुख्यमंत्र्यांचा खासगी सचिव आंदोलन परिसरात सतत माहितीची देवाण-घेवाण करत मराठा आंदोलनावर अंकुश ठेवत आहे.

प्रत्येकवेळी तो खासगी सचिव तिथं निरोप घेऊन सरकारच्या शिष्टमंडळात असतो. सद्या माहिती अशी आहे, की जालनाचे एसपी आणि कलेक्टर या सदगृहस्थाला सर -सर म्हणून हाक मारतात. कारण याने मराठा आंदोलन आणि जरांगे पाटील यांना आपणच हॅडल करत असल्याच्या बढाया मारणे सुरु केल्याचे बोलले जात आहे.

२२ डिसेंबर २०२३ नंतर ५ मिनिटही सरकारला वेळ देणार नाही, असे म्हणणारे जरांगे सरकारला २० जानेवारी २०२४ पर्यंत वेळ देतात. त्यामुळे मराठा आंदोलनाला राजकीय लागण झाल्याचे चित्र समोर येत आहे. आधी २० जानेवारीला मुंबईत येणार असे सांगायचे आणि नंतर परत २० जानेवारीला पायी आपण मुंबईला निघणार आणि २६ जानेवारीला मुंबईत पोहचणार असे सांगायचे. यामुळे जरांगे यांच्या भूमिकेवर आता संशय व्यक्त होतो आहे.

२२ जानेवारी २०२४ रोजी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा असल्याने आणि मुंबईत कायदा-सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून सरकारने त्यांना भूमिका बदलायला भाग पाडल्याचे बोलले जात आहे. आधी कुठल्याही राजकारण्याचे न एकणारे जरांगे आता मुख्यमंत्री शिंदे यांच्या इशाऱ्यावर निर्णय घेत असल्याची चर्चा आता मराठा आंदोलकच करत आहेत. यातून मराठे हरलेली लढाई पुन्हा एकदा लढत असल्याचे स्पष्ट होते आहे.

महत्वाच्या बातम्या