Sanjay Raut । शिवसेनेच्या वादातून मिलिंद देवरांनी काँग्रेसचा राजीनामा दिला? संजय राऊत म्हणाले, मला…

Sanjay Raut on Milind Deora Resigned To Congress

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sanjay Raut । मिलिंद देवरा यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. दक्षिण मुंबईतून देवरा ( Milind Deora ) यांची लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा असल्याने देवरा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली असल्याचे बोलले जात आहे.

महाविकास आघाडीत दक्षिण मुंबईची जागा हि शिवसेना ( ठाकरे गटाकडे ) आहे. तिथे अरविंद सावंत विद्यमान खासदार आहेत. दोन वेळा सावंत दक्षिण मुंबईतून निवडून आलेले आहेत.

दक्षिण मुंबईची लोकसभेची जागा शिवसेनाच (ठाकरे गट ) लढवणार असल्याची ठाम भुमीका ठाकरे गटाने घेतली आहे. त्यातून मिलिंद देवरा नाराज झाल्याचे बोलले जात आहे.

महाविकास आघाडीत ही जागा शिवसेनेकडे (ठाकरे गट ) असल्याने मिलिंद देवरा यांना दक्षिण मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवता आली नसती. देवरा यांना लोकसभा लढण्याची इच्छा असल्याने त्यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

Sanjay Raut on Milind Deora Resigned To Congress

मिलिंद देवरांच्या राजीनाम्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे, ते म्हणाले ”अरविंद सावंत दक्षिण मुंबईतून दोन वेळा निवडून आलेले आहेत. सावंत जर तिकडे निवडणूक लढणार असेल तर त्यामध्ये चुकीचं काय? ती जागा परंपरेने शिवसेनेची आहे. आम्ही तिथून लढू.

शिवसेनेमधून अनेक लोक बाहेर गेले आहेत. लोक त्या ठिकाणी पक्ष सोडून जात असतात. जे गेले त्यांना जाऊ द्या. त्याबद्दल मला काहीच वाटत नाही”, असं संजय राऊत म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या