Losing Jobs । 80% भारतीय लोक नोकरी गमावण्याच्या भीतीने जगत आहेत

80% Indians living in fear of losing jobs

Losing Jobs । देशात कोरोना नंतर बेरोजगारीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. कोरोनाकाळात प्रत्येकाचे आर्थिक हाल झाले होते. कोरोनामुळे अनेक व्यवसाय बंद पडले तसंच अनेकांच्या नोकऱ्याही (Jobs) गेल्या. तसंच शिक्षणातही विद्यार्थ्यांचं नुकसान झालं होते.

पण नोकऱ्यांमध्ये अचानक ही मोठी घट होण्यासाठी कोरोनाची साथ ही काही अंशीच जबाबदार असल्याचं अर्थतज्ज्ञांचं मत आहे.

JOIN WHATSAPP CHANNEL 

भारतातील नोकऱ्यांचं संकट दिसतं त्यापेक्षाही खूप गंभीर दिसून येत आहे.  Money9 च्या  सर्वेनुसार भारतातील 80% लोकांच्या नोकऱ्या धोक्यात असल्याचे समोर आले आहे.

80% Indians living in fear of losing jobs

80% लोकांमध्ये 24 टक्के लोकांकडे पुरेशी बचत आहे, त्यांनी नोकरी गमावल्यास ते 6 महिने जगू शकतात. तर ५४ टक्के लोक नोकरी गमावल्यास फक्त २-३ महिने नोकरीशिवाय जगू शकतात.

सर्वेनुसार बहुतेक भारतीय कुटुंबे आर्थिकदृष्ट्या सुरक्षित नाहीत. फक्त 6 टक्के कुटुंबे पूर्णपणे आर्थिकदृष्ट्या सुरक्षित आहेत. आणि 20 टक्के कुटुंबे कमी सुरक्षित आहेत.

असुरक्षित कुटुंबाचा आकडा ३६ टक्क्यांवर आहे तर ३८ टक्के कुटुंबे सद्या संकटात जगत आहेत. 7 टक्के भारतीय कुटुंबे अशी आहेत ज्यांचे मासिक उत्पन्न त्यांचे मासिक खर्चही पूर्ण होऊ शकत नाही.

बिहार, ओडिशा, झारखंड, आसाम आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये कुटुंबांचे मासिक उत्पन्न सर्वात कमी आहे. सर्वेक्षणानुसार, ३९ टक्के  भारतातीय कुटुंबे अशी आहेत ज्यांचे मासिक उत्पन्न १५ हजार रुपयांपेक्षा कमी आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.