Air strike in Pakistan | पाकिस्तानवर मोठी Air strike; शहीद ११ पोलिसांचा घेतला बदला

Iran Airstrike on Pakistan, Took Revenge For The Death Of 11 Policemen | Jaish Ul Adal

Air strike in Pakistan । पाकिस्तान दहशतवादी संघटनांचा केंद्र बनल्याचे अनेक वेळा समोर आले आहे. जैश अल अदल यासारख्या अनेक संघटना आतंकवादी पाकिस्तानात सक्रिय आहेत.

जैश अल अदल आणि जुंदल्लाह या संघटनेचे घनिष्ठ संबंध पाकिस्तानच्या ISI सोबत आहेत. जैश अल अदल आतंकवादी संघटनेने डिसेंबरमध्ये इराणी सुरक्षा पथकांवर हल्ला केला होता. त्यात इराणच्या 11 पोलिसांचा मृत्यू झाला होता.

इराणने या बद्दल वारंवार पाकिस्तानकडे नाराजी व्यक्त केली होती पण पाकिस्तानने कुठलेही कारवाई केली नव्हती. पाकिस्तानने इराण विरोधात जैश अल अदलचा वापर केल्याचे यातून स्पष्ट झाले होते.

Iran Airstrike on Pakistan, Took Revenge For The Death Of 11 Policemen

याचाच बदला म्हणून इराणने पाकिस्तानच्या बलूचिस्तानमध्ये जैश-अल-अदलच्या दोन दहशतवादी तळांना मिसाइल आणि ड्रोनने उडवून दिले ( Air strike in Pakistan). त्यात 2 लहान मुलांचा मृत्यू झाला असून 3 मुली जखमी झाल्या आहेत.

जैश उल-अदल ही पाकिस्तान-इराण सीमेवर सक्रीय असलेली दहशतवादी संघटना आहे. त्यांनी इराणी सुरक्षा पथकांवर हल्ले केले आहेत. एअर स्ट्राइक हा जैश अल अदलने केलेल्या हल्ल्याचा बदला आहे, अस इराणने म्हटलय.

Air strike in Pakistan Jaish Ul Adal 

इराणने दहशतवादी संघटना जैश अल अदलच्या ठिकाणांवर मंगळवारी रात्री हल्ले केले. इराणने हल्ल्यासाठी ( Air strike in Pakistan ) कमीत कमी 6 ड्रोन वापरली असं जैश अल अदलने म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.