🕒 1 min read
आज आपण ज्या खेळाडूंना टीव्हीवर चमकताना पाहतो, त्यांच्या यशामागे किती वेदना आणि संघर्ष दडलेला असतो याचा अंदाजही आपल्याला नसतो. मैदानावर आपल्या आक्रमक अंदाजाने फलंदाजांची भंबेरी उडवणारा टीम इंडियाचा एक ‘एक्का’ आता मोकळेपणाने व्यक्त झाला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या होम सीरिजमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या हर्षित राणा (Harshit Rana) ने आपल्या जुन्या दिवसांच्या आठवणींना उजाळा दिला आणि ऐकणाऱ्यांचे डोळे पाणावले.
Harshit Rana Interview
हर्षितने सांगितलं की, यशाची चव चाखण्याआधी त्याने तब्बल १० वर्षं फक्त नकार आणि अपयश पचवलं आहे. अनेकदा ट्रायल्स देऊनही निवड न झाल्याने तो पुरता खचला होता. “मला अपयश कसं हाताळायचं हे आता चांगलच माहित आहे, कारण मी ती १० वर्षं पाहिली आहेत जिथे काहीच घडत नव्हतं,” असं हर्षित म्हणाला.
हर्षित पुढे म्हणाला, “मी ट्रायलवरून परत यायचो आणि रोज बाबांसमोर रडायचो. मी अक्षरशः हार मानली होती.” पण अशा वेळी त्याचे वडील त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. वडिलांनी त्याला जबरदस्तीने, अक्षरशः ‘ढकलत’ पुढे नेलं आणि स्वप्न सोडू दिलं नाही. त्यामुळेच आज तो अपयशाला घाबरत नाही.
यावेळी हर्षितने भारतीय संघातील दिग्गज रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्याबद्दलही आपलं मत मांडलं. नेट्समध्ये या दोघांना बॉलिंग करणं हे सर्वात मोठं चॅलेंज असल्याचं तो सांगतो. “रोहित भाई आणि विराट भैया मला नेट्समध्ये चॅलेंज देतात, त्यामुळे माझी कामगिरी अजून सुधारते आणि मी माझा बेस्ट देतो,” असं त्याने कबूल केलं.
आयपीएलमध्ये केकेआरकडून (KKR) खेळताना ४० विकेट्स घेणाऱ्या हर्षितने आता भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये पदार्पण केलं आहे. २१ इनिंगमध्ये ३४ विकेट्स आणि बॅटिंगमध्येही थोडी चमक दाखवणारा हा खेळाडू आता इंदूरमध्ये होणाऱ्या निर्णायक वन-डे सामन्यासाठी सज्ज झाला आहे. सध्या भारत आणि न्यूझीलंड मालिका १-१ अशा बरोबरीत असून, रविवारी होणाऱ्या सामन्यात हर्षितकडून मोठ्या अपेक्षा आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- Police Election Duty: ७२ तास ड्युटी, फक्त ५०० रुपये? संतापलेल्या पोलिसाने केला ‘हा’ धक्कादायक प्रकार!
- दुखापतीमुळे कोणाचं नुकसान, कोणाचा फायदा? टीम इंडियात ‘या’ दोन वाघांची अचानक एन्ट्री!
- Gold Rate : सोनं भडकलं! 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या….
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











