Share

Eknath Shinde | शरद पवारांच्या अदानी प्रकरणावरील वक्तव्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया; म्हणाले…

🕒 1 min readEknath Shinde | मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी उद्योगपती गौतम अदानी यांच्या हिंडेनबर्ग प्रकरणावर वक्तव्य केलं होतं. तसंच त्यांनी अदानी हे प्रकरण देशासाठी महत्वाचं नसून त्यापेक्षाही देशात तीन मुद्दे महत्वाचे असल्याचं सांगितलं. याचप्रमाणे विरोधकांनी एका कंपनीने दिलेल्या अहवालाला गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिलं असं वक्तव्य त्यांनी केलं … Read more

Published On: 

🕒 1 min read

Eknath Shinde | मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी उद्योगपती गौतम अदानी यांच्या हिंडेनबर्ग प्रकरणावर वक्तव्य केलं होतं. तसंच त्यांनी अदानी हे प्रकरण देशासाठी महत्वाचं नसून त्यापेक्षाही देशात तीन मुद्दे महत्वाचे असल्याचं सांगितलं. याचप्रमाणे विरोधकांनी एका कंपनीने दिलेल्या अहवालाला गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिलं असं वक्तव्य त्यांनी केलं असल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली आहे.

शिंदे यांनी प्रॉपर्टी एक्स्पो 2023 च्या उद्घाटनासाठी कल्याण येथे हजेरी लावली त्यावेळी शिंदे म्हणाले की, अदानीनी घोटाळा केल्याचं सांगत आंदोलन करणाऱ्या पक्षांनी शरद पवार यांच्या वक्तव्यातून बोध घ्यावा. तर अदानी उद्योग समूहाबाबत विचारलेल्या प्रश्नावर अध्यक्ष शरद पवारांनी अदाणी उद्योगसमूहाची उघडपणे पाठराखण केली असल्याचं पाहायला मिळत आहे. तर काँग्रेसनेच अदानी उद्योग समूहाबाबत हिंडेंनबर्ग संस्थेने जाहीर केलेल्या अहवालानंतर या समूहात 20 हजार कोटी कुणाचे? असा प्रश्न विचारत वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलने सुरू केली होती, दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाने देखील जाब विचारला जात होता.

दरम्यान, याबाबत जेष्ठ नेते शरद पवार यांनीच अदानी उद्योग समूहाची पाठराखण केली असल्यामुळे आता या प्रकरणबाबत नक्की काय ते त्यांनीच उत्तर द्यावं, असं मत देखील शिंदेंनी त्यावेळी व्यक्त केलं. पुढे शिंदे म्हणाले की, जर शरद पवार यांनी अदानी समूहाचे समर्थन केलेलं आहे तर ते नक्कीच पूर्ण अभ्यास करूनच केलं असावं. त्यामुळे या मुद्द्यावर विरोधी पक्षांनी, काय ती उत्तरं द्यावीत असा टोला लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या