Devendra Fadnavis | फडणवीस-जरांगे आमने-सामने; मनोज जरांगेंनी उपोषण सोडल्यावर देवेंद्र फडणवीस म्हणतात…

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

Devendra Fadnavis | टीम महाराष्ट्र देशा: मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी (Maratha Reservation) मोठा लढा उभा केला आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी त्यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला सुरुवात केली. काल (02 नोव्हेंबर) त्यांच्या उपोषणाचा नववा दिवस होता.

काल मराठा आरक्षणाविषयी चर्चा करण्यासाठी मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी राज्य सरकारचं शिष्टमंडळ उपोषण स्थळी दाखल झालं होतं.

राज्य सरकारच्या शिष्टमंडळासोबत चर्चा केल्यानंतर मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी दोन महिन्यांची मुदत दिली आहे.

त्याचबरोबर यानंतर मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण स्थगित केलं आहे. मनोज जरांगे यांनी उपोषण सोडल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Devendra Fadnavis commented on Manoj Jarange

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मराठा आरक्षणासाठी गेल्या 9 दिवसांपासून उपोषणाला बसलेले श्री मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतल्याबद्दल राज्य सरकारच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो.

या प्रक्रियेत माजी न्यायमूर्ती न्या. सुनील शुक्रे आणि न्या. मारोती गायकवाड यांनी राज्य सरकारला बहुमूल्य सहकार्य केले, मी त्यांचे विशेष आभार मानतो. माझ्या सर्व सहकारी मंत्री आणि लोकप्रतिनिधी यांचेही आभार!”

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सुरू असलेल्या उपोषणादरम्यान मनोज जरांगे यांची प्रकृती अत्यंत खालावली होती.

आरक्षण मिळाल्याशिवाय उपचार घेणार नसल्याचं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं होतं. परंतु राज्य शासनाच्या शिष्टमंडळासोबत केलेल्या चर्चेनंतर मनोज जरांगे उपचार घेण्यासाठी रुग्णालयात दाखल झाले आहे.

त्यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यात आलेली असून त्यांच्या किडनी आणि लिव्हरवर सूज आली असल्याची माहिती डॉ. विनोद चावरे यांनी दिली आहे. योग्य उपचार घेतल्यानंतर मनोज जरांगे पूर्णपणे बरे होतील, असं  देखील डॉ. चावरे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe