Share

Maratha Reservation | नागरिकांना दिलासा; मनोज जरांगेंनी उपोषण मागे घेतल्यामुळे एसटी बसेस पुन्हा सुरू

Maratha Reservation | टीम महाराष्ट्र देशा: मराठा समाजाला आरक्षण मिळावं,  यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू केलं होतं.

राज्यातील मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावं, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली होती. अशात मराठा आंदोलनामुळे राज्यात बहुतांश बस डेपोतून बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या.

त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता. अशात नागरिकांसाठी दिलासादायक माहिती समोर आली आहे.

Manoj Jarange gave two months time to take a decision on Maratha reservation

मनोज जरांगे यांची मागणी (Maratha Reservation) पूर्ण करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे. यासाठी मनोज जरांगे यांनी राज्य शासनाला दोन महिन्यांचा कालावधी दिला आहे.

त्याचबरोबर मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण देखील स्थगित केलं आहे. त्यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर आंदोलन शांत झालेलं असून राज्यात पुन्हा एकदा बस सेवा सुरू करण्यात आली आहे.

आजपासून मराठवाड्यातील सर्व एसटी आगारात प्रवासी वाहतूक सुरू होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून बस सेवा खंडित झाल्यामुळे नागरिकांना अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. अशात आजपासून पुन्हा एकदा बस सेवा सुरू होणार आहे.

दरम्यान, मराठा समाजाचं आरक्षणासाठी (Maratha Reservation) सुरू असलेलं आंदोलन आक्रमक झालं होतं. याच पार्श्वभूमीवर राज्यात बहुतांश ठिकाणी जाळपोळ, घरफोडी, दगडफेक, रस्ता रोको आंदोलन तर बहुतांश ठिकाणी बस देखील फोडण्यात आल्या होत्या.

त्यामुळं पुणे आगाराने मराठवाडा विदर्भात जाणाऱ्या बंद केल्या होत्या. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातून जाणाऱ्या 780 बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या.

त्यानंतर मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण मागे घेतल्यानंतर पुन्हा एकदा बस सेवा सुरू झाली आहे. एसटी महामंडळाने गुरुवारी (2 ऑक्टोबर) रात्रीपासूनच इतर विभागाची बस सेवा सुरू केली आहे.

महत्वाच्या बातम्या

Maratha Reservation | टीम महाराष्ट्र देशा: मराठा समाजाला आरक्षण मिळावं,  यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now