Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या महिन्यात ऑक्टोबर हीटने नागरिकांना हैराण करून टाकले होते. अशात गेल्या आठवड्यापासून राज्यात थंडीची चाहूल लागली आहे.
त्यामुळे नागरिकांना उन्हापासून दिलासा मिळत आहे. पहाटेच्या वेळी थंडी वाढत असली तरी दुपारी उन्हाचा चटका जाणवत आहे. तर दुसरीकडे राज्यात थंडीची चाहूल लागलेली असताना देशाच्या दक्षिण भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
Cyclone conditions developed over Sri Lanka and nearby areas
श्रीलंका आणि जवळपासच्या परिसरामध्ये चक्रकार वाऱ्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. समुद्रसपाटीपासून 3.6 किलोमीटर उंचीवर हे चक्राकार वारे आहे.
त्याचबरोबर दक्षिण भारताकडे बंगालच्या उपसागराकडून जोरदार वारे वाहताना दिसत आहे. परिणामी दक्षिण भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात (Weather Update) आली आहे.
तमिळनाडू, केरळ आणि कर्नाटकच्या दक्षिण भागात 03 ते 05 नोव्हेंबर दरम्यान पाऊस पडणार असल्याचं हवामान खात्याने (Weather Update) म्हटलं आहे.
दरम्यान, राज्यामध्ये पहाटेच्या वेळी गुलाबी थंडी जाणवायला लागली आहे. राज्यातील बहुतांश भागात थंडीचे प्रमाण वाढत चाललं आहे. परंतु, यंदा राज्यात कमी थंडी राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला (Weather Update) आहे.
तर यावर्षी नोव्हेंबर महिन्यात देशातील किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने (Weather Update) दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- Maratha Reservation | मराठा समाजाला मुस्लिम समाजाचा पाठिंबा; मालेगावमध्ये मुस्लिम लोकांनी केलं उपोषण
- Maratha Reservation | राज्य सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगेंचं उपोषण मागे घेण्यात यशस्वी ठरणार? सरकारच्या शिष्टमंडळाची जरांगेंसोबत चर्चा सुरू
- Maratha Reservation | गुणरत्न सदावर्ते आक्रमक; मराठा आंदोलनाविरोधात केली याचिका दाखल
- Maratha Reservation | मराठा समाज आक्रमक, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा; माजी मंत्र्याची मागणी
- Maratha Reservation | शिंदे-फडणवीसांना लवकर निर्णय घेण्याची गरज; प्रकृती बिघडली असताना जरांगे तिघांचा आधार घेत कसेबसे चालले