Sesame Seeds | सकाळी रिकाम्या पोटी भाजलेल्या तिळाचे सेवन केल्याने आरोग्याला मिळतील ‘हे’ जबरदस्त फायदे

Sesame Seeds | टीम महाराष्ट्र देशा: तीळ आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. कारण तिळामध्ये भरपूर पोषक घटक आढळून येतात. यामध्ये प्रोटीन, कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयरन, फॅटी ऍसिड, मॅग्नीज, अँटिऑक्सिडंट इत्यादी गुणधर्म आढळून येतात. त्यामुळे तिळाचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. त्याचबरोबर सकाळी रिकाम्या पोटी भाजलेल्या तिळाचे सेवन केल्याने आरोग्याला खूप फायदे मिळू शकतात. भाजलेल्या तिळाचे सेवन केल्याने अनेक समस्या सहज दूर होऊ शकतात. सकाळी रिकाम्या पोटी भाजलेले तिळाचे सेवन केल्याने आरोग्याला पुढील फायदे मिळू शकतात.

हाडे मजबूत होतात (Bones become stronger-Sesame Seeds Benefits)

सकाळी रिकाम्या पोटी भाजलेल्या तिळाचे सेवन केल्याने हाडे मजबूत होऊ शकतात. तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि प्रोटीन आढळून येते, जे हाडांसाठी खूप फायदेशीर मानले जाते. त्यामुळे सकाळी रिकाम्या पोटी भाजलेल्या तिळाचे सेवन केल्याने हाडांचे दुखणे आणि सांधेदुखीपासून सुटका मिळू शकतो.

दातांसाठी फायदेशीर (Beneficial for teeth-Sesame Seeds Benefits)

सकाळी रिकाम्या पोटी भाजलेल्या तिळाचे सेवन करणे दातांसाठी फायदेशीर ठरू शकते. भाजलेले तीळ रिकाम्या पोटी चघळल्याने हिरड्या आणि दात मजबूत होऊ शकतात. तिळामध्ये माफक प्रमाणात विटामिन बी आढळून येते, जे दातांची काळजी घेण्यास मदत करते.

रक्तदाब नियंत्रणात राहतो (Blood pressure remains under control-Sesame Seeds Benefits)

भाजलेले तीळ सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात राहू शकतो. त्याचबरोबर सकाळी रिकाम्या पोटी भाजलेल्या तिळाचे सेवन केल्याने ह्रदय देखील निरोगी राहू शकते. तिळामध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम आढळून येते, जे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. त्याचबरोबर नियमित तिळाचे सेवन केल्याने हृदयविकाराचा धोका देखील कमी होतो.

सकाळी रिकाम्या पोटी भाजलेल्या तिळाचे सेवन केल्याने आरोग्याला वरील फायदे मिळू शकतात. त्याचबरोबर शरीरातील विटामिन एची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात पुढील पदार्थांचा समावेश करू शकतात.

रताळे (Sweet potatoes-Vitamin A Deficiency)

रताळ्यामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन ए आढळून येते. एका मध्यम आकाराच्या रताळ्यामध्ये 900mcg विटामिन ए आढळून येते. त्याचबरोबर यामध्ये बीटा कॅरोटीन देखील माफक प्रमाणात उपलब्ध असते. विटामिनसोबतच यामध्ये पोटॅशियम, विटामिन सी, फायबर आणि आयरन आढळून येते. त्यामुळे रताळ्याचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते.

पपई (Papaya-Vitamin A Deficiency)

निरोगी राहण्यासाठी आणि पाचन तंत्र मजबूत ठेवण्यासाठी पपई खूप फायदेशीर मानली जाते. पपईमध्ये भरपूर प्रमाणात विटामिन ए आढळून येते. त्याचबरोबर यामध्ये विटामिन बी, व्हिटॅमिन डी, कॅल्शियम, आयरन आणि प्रोटीन देखील भरपूर प्रमाणात उपलब्ध असते. त्यामुळे शरीरातील विटामिन एची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात पपईचा समावेश करू शकतात.

गाजर (Carrot-Vitamin A Deficiency)

गाजराचे सेवन करणे डोळ्यांसाठी खूप फायदेशीर मानले जाते. त्याचबरोबर गाजरामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए आढळून येते. विटामिन एसोबतच यामध्ये विटामिन सी, विटामिन के पोटॅशियम आणि आयरन चांगल्या प्रमाणात उपलब्ध असते. त्यामुळे गाजराचे नियमित सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या