Share

Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार ‘या’ जिल्हयातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी !

Eknath Shinde | मुंबई : मार्च महिन्यात देखील राज्यातील अनेक भागात पावसाने धुमाकूळ घातला होता. त्यावेळी अनेक जिल्ह्यातील शेतीमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यामुळे मार्चमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 177 कोटींची मदत राज्य शासनाने मंजूर केली आहे. तर एप्रिल महिन्यातील गेल्या ८ तारखेपासून हवामान विभागाने नोंदवलेल्या अंदाजानुसार सध्या राज्यात अवकाळी पावसानं (unseasonal rains) थैमान घातलं … Read more

Published On: 

Eknath Shinde | मुंबई : मार्च महिन्यात देखील राज्यातील अनेक भागात पावसाने धुमाकूळ घातला होता. त्यावेळी अनेक जिल्ह्यातील शेतीमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यामुळे मार्चमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 177 कोटींची मदत राज्य शासनाने मंजूर केली आहे. तर एप्रिल महिन्यातील गेल्या ८ तारखेपासून हवामान विभागाने नोंदवलेल्या अंदाजानुसार सध्या राज्यात अवकाळी पावसानं (unseasonal rains) थैमान घातलं आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतातील उभी पिकं जमिनदोस्त झाली आहेत. तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आणि पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे आज अहमदनगर (Ahmednagar) आणि धाराशीव (Dharashiv) जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत.

याचप्रमाणे काल म्हणजे 10 एप्रिलला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्या फळबागांचे, रब्बी पिकांचे नुकसान झालेले आहे. त्यांचे तातडीने पंचनामे करावेत अशा सूचना संबंधित तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायकांना दिल्या आहेत. तसचं सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी उभं आहे असं आश्वासन देखील त्यांनी दिलं. अवकाळी पावसाच्या तडाख्याने काढणीला आलेला गहू, हरभरा, उन्हाळ कांदा, भाजीपाला आणि पिकांना फटका बसला आहे. तर आता शेतकऱ्याच्या पदरात काय पडणार या कडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, काल तातडीने एकनाथ शिंदे यांनी नाशिक जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा केला होता. तर त्यांनी बागलाण तालुक्यातील बिजोटे, आखतवाडे, निताणे गावामध्ये अवकाळी पाऊस (Unseasonal rain), वादळी वारा आणि गारपीटीमुळं बाधित झालेल्या पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून मंत्रीमंडळात मदतीबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही शिंदे यांनी शेतकऱ्यांना दिली आहे. तर मिळालेल्या माहितीनुसार आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सकाळी 10 वाजता पारनेर तालुक्यातील वनकुटे गावात पाहणी करणार आहेत . त्यानंतर दुपारी दोन वाजता धाराशीव जिल्ह्यातील धारुर आणि दुपारी तीन वाजता वाडीबामणी या गावात नुकसानाची पाहणी करणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कधीपर्यंत मिळणार? असा प्रश्न उपस्थित केला जातं आहे.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही