🕒 1 min read
बार्बाडोस: ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज ( Australia vs West Indies ) यांच्यात बार्बाडोसमधील केन्सिंग्टन ओव्हल येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात पंचांच्या काही वादग्रस्त निर्णयांनी सामन्याला नाट्यमय वळण दिले आहे. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला १८० धावांवर गुंडाळल्यानंतर, वेस्ट इंडिजनेही आपल्या पहिल्या डावात १८० धावाच केल्या, मात्र तिसऱ्या पंचांच्या निर्णयांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ८२ धावांची छोटी पण महत्त्वपूर्ण आघाडी घेतली आहे.
कसोटीच्या दुसऱ्या दिवशी वेगवान गोलंदाजांचे वर्चस्व राहिले आणि फलंदाजांना धावा काढण्यासाठी संघर्ष करावा लागला. वेस्ट इंडिजने ४ बाद ५७ धावांवरून दुसऱ्या दिवसाची सुरुवात केली. सकाळच्या सत्रात कर्णधार रोस्टन चेस आणि पुनरागमन करणारा कसोटी फलंदाज शे होप यांच्यात ६७ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी झाली, ज्यामुळे यजमान संघ पहिल्या डावात आघाडी मिळवण्याच्या दिशेने जात होता. मात्र, दुपारच्या जेवणापूर्वी तिसऱ्या पंचांच्या दोन वादग्रस्त निर्णयांनी सामन्याचे चित्र पूर्णपणे बदलले आणि ऑस्ट्रेलियाने पुनरागमन केले.
Controversial Umpiring Decisions Australia vs West Indies
रोस्टन चेसचा वादग्रस्त पायचीत: वेस्ट इंडिजचा कर्णधार रोस्टन चेस पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर ४४ धावांवर असताना पायचीत झाला. त्याने लगेचच रिव्ह्यूची मागणी केली, कारण त्याला खात्री होती की चेंडू बॅटला लागून पॅडला लागला आहे. परंतु, तिसऱ्या पंचांनी (थर्ड अंपायर) रिव्ह्यू पाहिल्यानंतरही त्याला बाद घोषित केले. या निर्णयामुळे रोस्टन चेस १०८ चेंडूत ५ चौकारांसह ४८ धावांवर बाद झाला.
शे होपचा संशयास्पद झेल: रोस्टन चेसच्या विकेटनंतर काही वेळातच, चार वर्षांनंतर पहिलाच कसोटी सामना खेळणाऱ्या शे होपला ब्यू वेबस्टरने अॅलेक्स कॅरीच्या हाती झेलबाद केले. ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षकाने पुढे जाऊन एका हाताने हा झेल घेतला. टेलिव्हिजन रिप्लेमध्ये चेंडू मैदानावर आदळल्याचे स्पष्ट दिसत होते, तरीही तिसऱ्या पंचांनी ऑस्ट्रेलियाच्या बाजूने निर्णय दिला. होप ४८ धावांवर बाद झाल्याने वेस्ट इंडिजचा संघ बॅकफूटवर गेला.
या दोन महत्त्वाच्या विकेट्समुळे दुपारच्या जेवणापूर्वी पाच बाद १३५ धावांवरून यजमान संघ १९० धावांवर ऑलआऊट झाला आणि त्यांना केवळ १० धावांची माफक आघाडी मिळाली. कमिन्स आणि वेबस्टर यांनी चांगली गोलंदाजी केली, तर स्टार्क आणि लायनने त्यांना चांगली साथ देत वेस्ट इंडिजच्या संघाला झटपट गुंडाळले.
ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावाची सुरुवात पहिल्या डावासारखीच झाली आणि त्यांनी झटपट विकेट गमावले. उस्मान ख्वाजा अल्झारी जोसेफच्या गोलंदाजीवर १५ धावांवर पायचीत झाला, त्यानंतर सॅम कोन्स्टास पाच धावांवर बाद झाला. मात्र, या डावात वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी संघाचा वेगवान गोलंदाज शमार जोसेफच्या गोलंदाजीवर तब्बल ५ झेल सोडले, ज्यामुळे संघाचा प्रशिक्षक डॅरेन सॅमी प्रचंड वैतागलेला दिसला.
जोश इंग्लिसला जेडेन सील्सने क्लीन बोल्ड केले, तर कॅमेरून ग्रीन १५ धावांवर ग्रीव्हजच्या गोलंदाजीवर बाद झाला. ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या ४ बाद ९२ धावांवर खेळत असून त्यांच्याकडे ८२ धावांची आघाडी आहे. ट्रॅव्हिस हेड (२६ धावा) आणि ब्यू वेबस्टर (१७ धावा) हे खेळाडू नाबाद परतले आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- थरार वाढला! ‘या’ घातक गोलंदाजाचं ४ वर्षांनी कसोटीत कमबॅक; भारताविरुद्ध इंग्लंडचा संघ जाहीर!
- देश माझ्या लेकीपेक्षा महत्त्वाचा; इंग्लंड दौऱ्यापूर्वी केएल राहुलचा टीम इंडियासाठी मोठा त्याग, प्रशिक्षकांनी केला खुलासा
- “पुन्हा योग्य मार्गावर ये…” मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने पृथ्वी शॉची केली कानउघडणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now








