नॉटिंगहॅम: इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाची सुरुवात अपेक्षेप्रमाणे झाली नसली तरी, अनुभवी फलंदाज केएल राहुलने आपल्या खेळाने सर्वांना प्रभावित केले आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला पहिल्या कसोटीत इंग्लंडने ५ गडी राखून हरवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. दिल्ली कॅपिटल्सचे (IPL संघ) मुख्य प्रशिक्षक हेमांग बदानी यांनी राहुलच्या ( KL Rahul ) देशाप्रती असलेल्या निष्ठेचा आणि त्याच्या मोठ्या त्यागाचा एक महत्त्वाचा खुलासा केला आहे.
केएल राहुलच्या देशाप्रती असलेल्या समर्पणावर प्रकाश टाकताना हेमांग बदानी म्हणाले, “मला त्याच्याबाबतीत एक गोष्ट खूप आवडली. तो म्हणाला, ‘मला सराव सामना खेळायचा आहे. देशाप्रती त्याची असलेली निष्ठा महत्त्वाची आहे. इंग्लंडला लवकर जाऊन तिथे सराव करत दौऱ्यासाठी त्याला तयारी करायची होती.”
KL Rahul prioritizes nation over daughter
बदानी पुढे भावूक होत म्हणाले, “तो नुकताच बाबा झाला आहे, हे विसरून चालणार नाही आणि त्याची मुलगीही त्याच्याबरोबर तिथे नसणार आहे. त्यावर राहुल म्हणाला, ‘माझ्या मुलीआधी देश महत्त्वाचा आहे.’ हा खूप मोठा निर्णय आहे.”
“तो सहज म्हणू शकला असता की, मी सराव सामना खेळणार नाहीये, मी थेट कसोटी सामना खेळेन, पण त्याने तसं केलं नाही,” असे बदानी यांनी राहुलच्या व्यावसायिक दृष्टिकोनाचे कौतुक करताना नमूद केले.
इंग्लंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी राहुलने ( KL Rahul ) प्रशिक्षक बदानी यांना सांगितले होते, “मला या संघाची काळजी आहे आणि मला इंग्लंडला लवकर जायचे आहे.” बदानींच्या मते, “त्याच्या डोळ्यात आणि त्याच्या बोलण्यात मला संघासाठी योगदान देण्याची भूक दिसत होती. रोहित आणि विराटच्या अनुपस्थितीत तो सर्वात वरिष्ठ फलंदाज ठरतो आणि त्याने ही भूमिका खरोखरच उत्तम प्रकारे बजावली आहे.”
केएल राहुलने पहिल्या कसोटीच्या दोन्ही डावांत उत्कृष्ट कामगिरी करत संघाला चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या डावात त्याने ४२ धावा केल्या, तर दुसऱ्या डावात शतक झळकावत भारताचा डाव सावरला.
📌 महत्वाच्या बातम्या
- “पुन्हा योग्य मार्गावर ये…” मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने पृथ्वी शॉची केली कानउघडणी
- भारतीय महिला संघाचे इंग्लंडविरुद्ध विजयी सलामीचे लक्ष्य; आजपासून ट्वेन्टी२० मालिकेला सुरुवात
- उद्धव ठाकरेंनीच मुख्यमंत्री असताना हिंदी सक्तीचा अहवाल स्वीकारला; फडणवीसांचा ठाकरे गटावर गंभीर आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











