Arnala ocean | अर्नाळा । सध्या संपूर्ण राज्यामध्ये मुसळधार पाऊस (heavy rain) पडत आहे. यामुळे वातावरणामध्ये देखील मोठे बदल झाले आहेत. त्यामुळे अनेकजण फिरण्यासाठी वेगेवेगळ्या ठिकाणी जात आहेत. लोकांना मान्सूनमध्ये फिरायला जाण्याचा मोह आवरत नाही. ट्रेकिंग, समुद्रकिनारा, धबधब्यावर जाण्यास लोक प्राधान्य देतात. त्यामुळे या ठिकाणी अनेकजण फिरण्यासाठी जात आहेत. मात्र पावसाळ्यामध्ये अशा ठिकाणी फिरण्यास जाण्याचा मोह आवरायला हवा. कारण की, हाच मोह अंगाशी येऊ शकतो. सध्या देखील एका तरुणाला फिरायला जाणे चांगलेच महागात पडले आहे. तरुणासोबत अत्यंत हृदयद्रावक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.
18- time-old drowned in Arnala ocean
माहितीनुसार, अर्नाळा समुद्रामध्ये 18 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अमित संतोष गुप्ता( Amit Santosh Gupta) असं या तरुणाचं नाव आहे. हा तरुण त्याच्या मित्रांसोबत अर्नाळा समुद्रात( Arnala Sea) पोहायला गेला होता यावेळी त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
अमित हा नालासोपारा (Nalasopara) पूर्व आचोळा या ठिकाणचा रहिवासी असून काल तो त्याच्या तीन मित्रांसोबत समुद्रकिनारी पोहायला गेला होता. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने अमित पाण्यात बुडाला. या घटनेची माहिती मिळताच त्याला पाण्याच्या बाहेर काढण्यात आले आणि तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याच्या मृत्यूने कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
दरम्यान, समुद्र किनाऱ्यावर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. तरीदेखील लोक समुद्रकिनारी जाऊन पोहत आहेत. त्यामुळे काहींना जीव देखील गमवावा लागत आहे. त्यामुळे पर्यटकांनी समुद्र किनाऱ्यावर जाऊ नये असे अहवान प्रशासना कडून करण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Sharad Pawar | खोटं बोला पण रेटून बोला हे धोरण देवेंद्र फडणवीस कधी सोडणार? राष्ट्रवादीचा फडणवीसांना खडा सवाल
- Ashish Shelar | शरद पवारांचं स्टेटमेंट म्हणजे गुगली नाही तर गाजराची पुंगी – आशिष शेलार
- Chitra Wagh | महिला-मुलींच्या सुरक्षेबाबत शिंदे-फडणवीस सरकार कटीबद्ध; चित्रा वाघांचा विरोधकांना टोला
- Devendra Fadnavis | छत्रपती संभाजीनगर हे नाव शरद पवारांना मान्य नाही – देवेंद्र फडणवीस
- Nitesh Rane | आदित्य ठाकरेंच्या आयुष्यातला शकुनी कोण? नितेश राणे म्हणतात…