Ajit Pawar | “या मंत्र्यांना जनाची नाही, तर मनाची तरी लाज वाटायला हवी?”; अजित पवार आक्रमक

Ajit Pawar | मुंबई : विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आज सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि मंत्री गैरहजर राहिल्याचे चित्र पाहण्यास मिळालं. त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) आमदार आणि मंत्र्यांवर चांगलेच आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले.

“जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटायला हवी”

“मी सरकारच्या काळात मंत्री असताना सकाळी ९ वाजता सभागृहात उपस्थित राहत होतो. आज सकाळी ९:३० वाजता कामकाज सुरू झालं तरीही सभागृहात एक ही मंत्री उपस्थित नाही. किमान संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तरी उपस्थित राहायला हवं. यांना जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटायला हवी. मंत्री कशाला केलं जातंय? महाराष्ट्र बघतोय एक मंत्री उपस्थित नाही”, अशा शब्दात अजित पवारांनी सभागृहात गैरहजर राहणाऱ्या विरोधी पक्षातील आमदार, मंत्र्यांवर ताशेरे ओढले आहेत.

“जमत नसेल तर कामकाज पाहूच नका”

अजित पवारांच्या या आक्षेपाबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलगिरी व्यक्त केली. “देवेंद्र फडणवीस आम्ही तुम्हाला सिनियर म्हणून बघतोय तुम्ही तरी ताकीद द्या की मंत्र्यांना. संसदीय कामकाज मंत्री म्हणून चंद्रकांत पाटील यांना कामकाज पाहणे शक्य नसेल तर त्यांनी कामकाज पाहू नये”, अशी मागणीच अजित पवारांनी केली आहे.

“आज सभागृहात केवळ मंगलप्रभात लोढांची लक्षवेधी झाली. सहा मंत्री गैरहजर होते. यांना जनाची नाही, तर किमान मनाची काही आहे का? अशाप्रकारचे शब्द वापरताना आम्हालाही वाईट वाटतं. काल रात्री एक-दीड वाजेपर्यंत लोक बसली. सकाळी ज्यांची लक्षवेधी होती ते दोन्हीकडील आमदार आले आणि मंत्रीच उपस्थित नाही. मंत्र्यांना असं काय काम आहे?”, असंही अजित पवार म्हणाले आहेत.

Ajit Pawar Aggressive on Opposition Party MLA and Ministers

“देवेंद्र फडणवीसांना आम्ही विश्वासू-प्रामाणिक म्हणून पाहतो. त्यांना उच्चविद्याविभूषित अशी नावं दिली आहेत, पण तुमचंही लक्ष नाही. त्यांनी त्यांच्या काही मंत्र्यांना सांगावं. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री रात्री दोन वाजेपर्यंत काम करतात. त्यामुळे त्यांना सकाळी लवकर येण्याची अडचण आम्ही समजून घेतो. मात्र, चंद्रकांत पाटील रात्री दोन-अडीचपर्यंत जागत नाहीत. त्यांनी सकाळी लवकर उठून आलं पाहिजे. संबंधित ज्यांची लक्षवेधी आहे त्यांनी आलं पाहिजे,” असंही अजित पवार म्हणाले आहेत.

“मंत्री झाल्यावर सभागृहाची परंपरा पाळत नाहीत “

“या मंत्र्यांना मंत्री करताना मागेमागे पळता. हे मी म्हणत नाही, सकाळी कालीदास कोळंबकरांनी सांगितलं. हे मंत्री होण्यासाठी पुढे-पुढे जातात, आम्हाला मंत्री करा म्हणून सांगतात आणि मंत्री झाल्यावर सभागृहाची परंपरा पाळत नाहीत आणि दिलेलं वैधानिक काम करत नाहीत,” असं अजित पवार म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.