Gulabrao Patil | “…म्हणून आम्ही पवारांना घाबरुनच असतो”; गुलाबराव पाटलाचा मिश्किल टोला

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Gulabrao Patil | जळगाव : शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार, मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) हे आपल्या विशिष्ट भाषा शैलीमुळे नेहमीच चर्चेत असतात. नुकतेच गुलाबराव पाटील यांनी जळगाव ग्रामीण मतदारसंघातील एका विवाह सोहळ्याला उपस्थिती दर्शवली होती. विवाह सोहळ्यातील मुलीकडच्या मंडळीचे आडनाव पवार होते. यावेळी बोलतानाचा त्यांनी पवारांना मिश्किल टोला लगावला आहे.

काय म्हणाले गुलाबराव पाटील?

“आम्ही पवारांना घाबरुनच असतो. कारण तुम्ही सकाळी-सकाळी शपथ घेता आणि काय करुन टाकता ते आम्हाला माहिती नाही. त्यामुळे पवारांना कायम बरोबर ठेवावे लागते. कारण पवारांची बुद्धी चालते तशी कोणचीही चालत नाही”, असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले. गुलाबराव पाटील यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकल्याचं पहायला मिळालं आहे.

Gulabrao Patil Criticize Ajit Pawar

गुलाबराब पाटील आपल्या बोलण्याच्या शैलीने भाषणातून अनेक राजकीय नेत्यांची कोंडी करताना वारंवार पहायला मिळते. जळगाव ग्रामीण मतदारसंघात गुलाबराव पाटील मंगळवारी लग्नात वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी गेले होते. यावेळी मुलीकडचे आडनाव पवार असल्याने गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विरोधीपक्षनेते अडित पवार यांच्यावर निशाणा साधल्याचं पहायला मिळालं आहे.

दरम्यान, अजित पवार आणि  भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर पहाटे शपथविधी घेतल्याने राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला होता. त्यावरुन विरोधी पक्षांमध्ये तुफान कलगितुरा रंगला. 2019 साली झालेल्या या राजकीय घटना आजही राजकीय नेत्यांनी ताजी ठेवत त्यावरुन मिश्किल टोलेबाजी करताना पहायला मिळते.

महत्वाच्या बातम्या-