Weather Update | ‘या’ ठिकाणी पावसाची शक्यता, तर ‘या’ भागांमध्ये येणार उष्णतेची लाट

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: सध्या राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. राज्यामध्ये मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने (Unseasonal rain) हजेरी लावली आहे. तर 15 ते 18 मार्च दरम्यान राज्यामध्ये पुन्हा एकदा अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात करण्यात आली आहे. या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे तयार करण्यात यावे, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.

‘या’ ठिकाणी पावसाची शक्यता (Chance of rain at ‘this’ place)

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार (Weather Update), राज्यात पालघर, मुंबई, नागपूर, भंडारा, वर्धा, गडचिरोली हे जिल्हे वगळता उर्वरित राज्यात पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि गारपिटीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राज्यात पुण्यासह अहमदनगर, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये 16 मार्च रोजी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

‘या’ भागांमध्ये येणार उष्णतेची लाट (A heat wave will occur in ‘these’ areas)

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार (Weather Update), हरियाणा आणि राजस्थानच्या उत्तर भागासोबतच पश्चिम हिमालय आणि उत्तर प्रदेश या भागांमध्ये पावसाच्या तुरळक सरी बरसण्याचा अंदाज आहे. तर झारखंड, मध्य प्रदेश, केरळ, आसाम, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश या ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे या भागांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळू शकतो, असा अंदाज देखील हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्याला नुकसानाला सामोरे जावे लागले आहे. शेतीतील गहू, हरभरा, मक्का या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.

महत्वाच्या बातम्या