Share

Aaditya Thackeray | “वरळीच्या गल्लीगल्लीत फिरायला लावणार, तरीही…”; आदित्य ठाकरेंचा शिंदे-फडणवीसांना इशारा

Aaditya Thackeray | नाशिक : शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेचे दोन गट पडले. त्यानंतर शिवसेनेच्या ठाकरे गट आणि शिंदे गटाने एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हातमिळवणी केली आणि नवं सरकार स्थापन केलं. त्यांनी सेनेच्या 40 आमदारांना आपल्यासोबत नेलं. या पार्श्वभूमीवरुन शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वरळीतून लढवून दाखवण्याचं चॅलेंज दिलं होतं. ते शिंदे गटाने स्विकारुन शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी निवडणूक लढवून दाखवू त्यासाठी एकनाथ शिंदेंची गरज नाही आम्हीच तुम्हाला हरवू, असा विश्वास व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज वरळीत सभा होणार आहेत. या पार्श्वभूमीवर युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर चांगलाच निशाणा साधला आहे.

“वरळीतील गल्लीगल्लीत फिरायला लावणार”(Aaditya Thackeray Criticize CM Eknath shinde)

“कितीही नेते येऊदे वरळीतील गल्लीगल्लीत फिरायला लावणार, तरी विजय आपलाच होणार”, असा विश्वास आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला आहे. आदित्य ठाकरेंच्या संवाद यात्रेचा आज दुसरा दिवस आहे. नाशिकच्या चांदोरी येथे आयोजित सभेत ते बोलत होते.

“पाठीवर वार करुन विरोधी पक्षात बसवण्यात आलं. वरळीतून लढणं जमत नव्हतं, तर मला फोन करुन सांगायचं, मी ठाण्यात येऊन लढलो असतो,” असा टोला आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

“मला मोठ्या सभा घ्यायच्या नाहीत, मला अशाच छोट्या सभा घ्यायच्या आहेत. मोठ्या सभा घेतल्या तर नागरिकांमध्ये जाता येत नाही. गद्दार आणि मुख्यमंत्री सभा घेतात, तेव्हा खोके वाटले जातात. पण, तरीही खुर्च्या रिकाम्या असतात,” असं आदित्य ठाकरेंनी सांगितलं आहे.

“…पण महाराष्ट्राचा सुवर्णकाळ हरवला”- Aaditya Thackeray

“दुःख याचं नाही की उद्योग बाहेर गेले; मात्र राजकीय अस्थिरत्यामुळे रोजगार येत नाहीत. कधीही एवढं घाणेरडं राजकारण महाराष्ट्रात नव्हतं. माझ्याकडे देण्यासारखं काही नाही मी तुमच्याकडून घ्यायला आलेलो आहे. सध्या राज्यात गलिच्छ राजकारण सुरू आहे. हे राजकारण बदलायचं आहे. जेव्हा तुम्ही मला भेटता बोलता, तेव्हा वाटतं की महाराष्ट्राला सुवर्णकाळ येईल, पण महाराष्ट्राचा सुवर्णकाळ हरवला आहे,” असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

Aaditya Thackeray | नाशिक : शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेचे दोन गट पडले. त्यानंतर शिवसेनेच्या ठाकरे गट आणि …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Nashik Politics

Join WhatsApp

Join Now