Share

Nana Patole | “कुटुंबाचा वाद पक्षावर येऊ नये”; सत्यजीत तांबे प्रकरणावर नाना पटोलेंचं मोठं वक्तव्य

🕒 1 min readNana Patole | मुंबई : काँग्रेसमधील अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर आला आहे. काँग्रेसमध्ये विजयाची रेलचेल सुरु झाली आहे. विधानपरिषदेच्या निवडणुका झाला त्यात काँग्रेसला यश मिळालं आहे. भाजपच्या ताब्यातील जागा काँग्रेसने जिंकल्या आहेत. महागाई, बेरोजगारी, शेतकरी, छोट्या व्यापाऱ्यांचे प्रश्नाकडे केंद्रातील मोदी सरकारचं दुर्लक्ष होत आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केली आहे. … Read more

Published On: 

🕒 1 min read

Nana Patole | मुंबई : काँग्रेसमधील अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर आला आहे. काँग्रेसमध्ये विजयाची रेलचेल सुरु झाली आहे. विधानपरिषदेच्या निवडणुका झाला त्यात काँग्रेसला यश मिळालं आहे. भाजपच्या ताब्यातील जागा काँग्रेसने जिंकल्या आहेत. महागाई, बेरोजगारी, शेतकरी, छोट्या व्यापाऱ्यांचे प्रश्नाकडे केंद्रातील मोदी सरकारचं दुर्लक्ष होत आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केली आहे.

तांबे प्रकरणात ‘एबी फॉर्म’चा काय घोळ झाला होता?

“10 जानेवारील प्रदेश नागपूरला प्रदेश कार्यकारणीची बैठक पार पडली होती. तेव्हा संघटना सचिवांना एबी फॉर्म देण्यास सांगितलं होतं. त्यानुसार फॉर्म देण्यात आला होता; पण तो नागपूरचा असल्याचं समोर आलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ११ तारखेला बाळासाहेब थोरातांचे जवळील व्यक्ती मनोज शर्मांकडे दुसरा फॉर्म पोहचवण्यात आला.”

“कुटुंबाचा वाद पक्षावर येऊ नये”

“मग, सुधीर तांबेंनी उमेदवारी दाखल करायला हवी होती. मात्र, त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. त्यांनी सांगितलं, सत्यजीत तांबेंचं नाव लिहलं नसल्याने आम्ही अर्ज दाखल केला नाही. परंतु, चुका होताच आणि झाल्या आहेत. वेळेवर दुरुस्त केल्यावर त्याला चूक म्हणत नाही. पण, हा कुटुंबाचा वाद आहे. कुटुंबाचा वाद पक्षावर येऊ नये, याची काळजी सर्वांना घेतली पाहिजे,” असा सल्ला नाना पटोलेंनी दिला आहे.

“माझ्याकडे या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळ नाही”- Nana Patole

“नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या निमित्ताने बरंच राजकारण शिकायला मिळालं. माझ्याकडे या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळ नाही. मला काँग्रेसच्या विचारसरणीला पुढे नेऊन निवडणुकांमध्ये विजयी करायचं आहे. ते काम मी करत आहे. कोण काय राजकारण करत आहे त्यात मला पडायचं नाही. मी एक सामान्य शेतकरी माणूस आहे. मला या सगळ्या राजकारणात पडायचं नाहीये. मी सरळ मार्गाने या राजकारणात आलो आहे”, असं नाना पटोले म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या