Share

मॉन्सून अखेर सुसाट, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; पुढील २४ तासांत ‘या’ भागांत कोसळणार मुसळधार पाऊस

अरबी समुद्रात रेंगाळलेला मॉन्सून अखेर पुढे सरकला असून, पुढील २४ तासांत मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Published On: 

Monsoon Update - Heavy rain falling on agricultural fields in Maharashtra.

🕒 1 min read

गेल्या १५ दिवसांपासून चातकासारखी आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजाची प्रतीक्षा संपणार की चिंता आणखी वाढणार? हवामान विभागाने आता राज्यातील पावसाबाबत अत्यंत मोठी माहिती दिली आहे.

अरबी समुद्रात गेल्या दोन आठवड्यांपासून रेंगाळलेल्या मॉन्सूनने (Monsoon Update) अखेर पुढची वाटचाल सुरू केलीये. हा ताजा Monsoon Update शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा असून, पाऊस आता पुणे, लातूर, धाराशिव आणि अलिबागच्या वेशीपर्यंत पोहोचला आहे.

Maharashtra Monsoon Update

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, उद्यापर्यंत मुंबईसह राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मॉन्सून पूर्णपणे सक्रिय होईल. ४ जूनला केरळमध्ये आलेल्या आणि ८ जूनला तळ कोकणात पोहोचलेल्या पावसाची गती अचानक मंदावली होती. त्यामुळे पेरण्या खोळंबल्या होत्या, पण आता पाऊस सुसाट धावतोय.

दुसरीकडे, विदर्भातील जिल्ह्यांसाठी आज वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग भागात सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून अनेक ठिकाणी रिमझिम सुरू झाली आहे. पुण्यातही आज पावसाचा इशारा देण्यात आलाय.

पाऊस उशिरा आला असला तरी सध्या राज्यात पोषक वातावरण तयार झालं आहे. धुळे, शिरपूर, साक्री आणि शिंदखेडा तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाने दमदार एन्ट्री केलीये. त्यामुळे कडक उन्हाने आणि उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना कमालीचा गारवा अनुभवता येत आहे.

नाशिकच्या लासलगाव परिसरातही विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. पेरण्या रखडल्यामुळे चिंतेत असलेला शेतकरी वर्ग या पावसामुळे सुखावला आहे. मात्र, जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण होऊन पेरणी योग्य वातावरण होण्यासाठी अजून दोन ते तीन मोठ्या पावसाची गरज असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही