Share

शतक हुकलं, IPL मधून बाहेर होताच वैभव सूर्यवंशीच्या डोळ्यात पाणी आलं; सामना गमावल्यानंतर त्याने असं काय केलं?

आयपीएल २०२६ च्या क्वालिफायर-२ मध्ये गुजरात टायटन्सकडून पराभव झाल्यानंतर राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी मैदानावरच ढसाढसा रडला आणि थेट डगआऊटमध्ये निघून गेला.

Published On: 

Vaibhav Sooryavanshi Emotional sitting in dugout crying after losing IPL match

🕒 1 min read

एखाद्या मोठ्या विजयाच्या अगदी जवळ पोहोचून अचानक पराभवाचा धक्का बसला, तर काय अवस्था होते? आयपीएल २०२६ चा अखेरचा टप्पा अशाच एका अत्यंत भावुक आणि नाट्यमय प्रसंगाचा साक्षीदार ठरलाय.

चंदीगडच्या मैदानावर काल रात्री खेळवल्या गेलेल्या क्वालिफायर-२ च्या सामन्यात गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) ७ विकेट्सने धुव्वा उडवला. राहुल तेवतियाने विनिंग चौकार मारताच राजस्थान रॉयल्सचे यंदाच्या आयपीएल फायनलचे स्वप्न भंगले आणि याच पराभवानंतर राजस्थानचा स्टार फलंदाज वैभव सूर्यवंशी (Vaibhav Sooryavanshi) मैदानावरच ढसाढसा रडला.

Vaibhav Sooryavanshi Emotional

या सामन्यात वैभवने गुजरातच्या भल्याभल्या गोलंदाजांवर जोरदार हल्लाबोल करत अवघ्या ९६ धावांची तुफानी खेळी केली होती. त्याने यंदाच्या संपूर्ण सीजनमध्ये जसप्रीत बुमराहसह जगातील दिग्गज बॉलर्सची धुलाई करत चौकार-षटकारांचा पाऊस पाडलाय.

त्याच्या या वादळी कामगिरीने क्रिकेट विश्वात मोठी खळबळ उडाली होती. त्याच्या धडाकेबाज रन्सच्या बळावर राजस्थानने गुजरातसमोर २१५ धावांचे डोंगराएवढे विशाल लक्ष्य ठेवले होते, मात्र गुजरातने ८ चेंडू आणि ७ विकेट्स शिल्लक ठेवून हे लक्ष्य अगदी सहज पार केले. सामना हातातून गेल्याचे पाहताच मैदानावर उभा असलेला वैभव प्रचंड संतापलेला दिसला.

दुसरीकडे, टीमचा सिनियर खेळाडू रवींद्र जाडेजाने खेळपट्टीवरच त्याला शांत करण्याचा खूप वेळ प्रयत्न केला. दोघांमध्ये बरीच चर्चा झाली, पण वैभवचे दुःख अनावर झाले होते.

त्यामुळेच त्याने अत्यंत निराश होऊन गुजरातच्या खेळाडूंशी हस्तांदोलनही केले नाही आणि तो थेट डगआऊटमध्ये निघून गेला. खेळात ही खिलाडूवृत्ती मानली जात नसली, तरी वैभवचा संताप आणि दुःख स्पष्ट दिसत होते. डगआऊटमध्ये खुर्चीवर बसून त्याने आपल्या टोपीने चेहरा पूर्णपणे लपवून घेतला होता, पण त्याच्या डोळ्यात आलेले अश्रू कॅमेऱ्याने अचूक टिपले.

यंदाच्या सीजनमध्ये वैभव सूर्यवंशीने राजस्थानसाठी १४ सामन्यात ७७६ धावा कुटल्या असून त्याचा स्ट्राईक रेट २३७.३१ चा होता. सर्वात मोठी खंत म्हणजे मागच्या चार सामन्यांमध्ये तीनवेळा त्याचे शतक अवघ्या काही धावांनी हुकले; तो लखनऊविरुद्ध ९३, हैदराबादविरुद्ध ९७ आणि काल ९६ धावांवर बाद झाला. त्यामुळेच इतक्या जवळ पोहोचून पराभव पत्करावा लागल्याने या युवा खेळाडूचे मन पुरते तुटले.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!